E20 Petrol Experiment : E20 पेट्रोलच्या वादात नवा ट्विस्ट! भाजप खासदारानेच पेट्रोल अन् इथेनॉलला लावली आग, दोन्हीपैकी चांगलं काय?

MP Konda Reddy's E20 Petrol Experiment : केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यानंतर आता तेलंगणातील भाजप खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनीही E20 पेट्रोलचे समर्थन करणारआ एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते पेट्रोल आणि इथेनॉलवर एक प्रयोग करताना दिसत आहेत.
BJP MP Konda Vishweshwar Reddy's E20 petrol experiment
E20 petrol experiment by BJP MPSarkarnama
Published on
Updated on

E20 petrol pollution comparison: पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून तयार करण्यात आलेल्या E20 इंधनावर देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते आणि इंजिनावरही त्याचा परिणाम होतो, असा आरोप विरोधकांसह काही नागरिकांकडून केला जातो. मात्र, सरकारकडून E20 पेट्रोलचे समर्थन केले जात आहे.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यानंतर आता तेलंगणातील भाजप खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनीही E20 पेट्रोलचे समर्थन करणारआ एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी या व्हिडिओमध्ये पेट्रोल आणि इथेनॉलवर एक प्रयोग करताना दिसत आहेत.

या व्हिडिओच्या माध्यमातून रेड्डी यांनी शुद्ध पेट्रोल, शुद्ध इथेनॉल आणि इथेनॉल मिश्रित इंधनाच्या ज्वलन प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्यास ज्वलन प्रक्रिया अधिक स्वच्छ होऊ शकते आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होऊ शकते, असा त्यांनी दावा केला.

BJP MP Konda Vishweshwar Reddy's E20 petrol experiment
Kunbi Caste Certificate: कुणबी जातवैधता पडताळणीची वस्तुस्थिती; आकडेवारी नेमकं काय सांगते? मराठा-कुणबी नोंद मुद्दा काय?

व्हिडिओमध्ये रेड्डी यांच्या समोर दोन वेगवेगळ्या बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, एका बाटलीमध्ये शुद्ध पेट्रोल असून दुसऱ्या बाटलीमध्ये भारतातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्यापासून तयार करण्यात आलेले इथेनॉल आहे. रेड्डी दोन्ही बाटल्यांमधील द्रव वेगवेगळ्या स्टीलच्या वाट्यांमध्ये घेतात आणि ते पेटवतात.

BJP MP Konda Vishweshwar Reddy's E20 petrol experiment
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या आदेशाने सभा घेतली, झंझावाती भाषणानंतर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्तता, शिवसेना नेत्यालाही दिलासा

पेट्रोल असलेल्या वाटीतील आग अधिक वेगाने आणि उंच ज्वाळांसह जळतेय, तर इथेनॉल असलेल्या वाटीतील आग तुलनेने कमी दिसतेय. यानंतर ते आगीच्या मागे एक पांढरा बोर्ड धरून दोन्ही इंधनांमधून किती काळा धूर निर्माण होतो, हे दाखवण्याचा प्रयत्न करताायत. आग विझल्यानंतर पेट्रोल असलेल्या वाटीचा आतील भाग काळवंडलेला दिसतो, तर इथेनॉल असलेली वाटी तुलनेने अधिक स्वच्छ असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यानंतर रेड्डी दोन्ही वाट्या एका पेपरने साफ करत नागरिकांना आपण कोणाच्या बाजूने आहोत, असा प्रश्न विचारत आहेत. आयात केलेल्या पेट्रोलच्या बाजूने की भारतात तयार होणाऱ्या इथेनॉलच्या बाजूने? असा प्रश्न ते यावेळी विचारत आहेत. मात्र, एखाद्या इंधनामुळे प्रत्यक्षात किती प्रदूषण होते, हे केवळ अशा छोट्या प्रयोगावरून निश्चित करता येत नाही. वाहनाच्या इंजिनमध्ये इंधन जळण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते.

इंजिनची रचना, इंधनाची गुणवत्ता, वाहनातील तंत्रज्ञान आणि उत्सर्जन नियंत्रण प्रणाली यांसारखे अनेक घटक त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पेट्रोल आणि इथेनॉल वेगवेगळ्या भांड्यांमध्ये जाळून तयार झालेल्या काळ्या थरावरून E20 पेट्रोलमुळे होणारे प्रत्यक्ष प्रदूषण किंवा इंजिनवर होणारा परिणाम निश्चितपणे सिद्ध करता येणार नाही. E20 संदर्भातील कोणत्याही दाव्याकडे वैज्ञानिक आणि तांत्रिक संदर्भातून पाहणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून या व्हिडिओवर येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com