
Pune News : अजित पवारांवर आरोप करत शिवसेना फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदार भाजपसोबत गेले. आता अजित पवारच सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाची पुन्हा एकदा घालमेल सुरू झाली. मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या शिंदे गटातील काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ही नाराजी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानिमित्त पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. यावर तोडगा काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दमछाक झाल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)
राष्ट्रवादीच्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार अदिती तटकरेंना मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावलेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. दोघेही एकाच जिल्ह्यातील असल्याने तटकरेंना पालकमंत्रीपद मिळणार यात काही शंका नाही. मात्र तटकरेंना पालकमंत्रीपद देण्यास जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी विरोध दर्शवल्याने राष्ट्रवादीसह मुख्यमंत्री शिंदेंनीही सबुरीने घेतल्याचे राज्याने पाहिले.
या पार्श्वभूमीवर आता स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार हा प्रश्न सरकारपुढे ठाकला होता. मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंनी सावध भूमिका घेतली तर त्यास राष्ट्रवादीनेही दोन पावले मागे सरून साथ दिली. परिणामी जिल्ह्यातील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील होणारा वाद तात्पुरता तरी थांबल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगडमधील ध्वजारोहण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर मंत्री आदिती तटकरे यांना पालघर जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी ऐनवेळी ध्वजारोहण करण्याऱ्या मंत्र्यांच्या यादीत बदल केल्याने अधिकाऱ्यांना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्य सरकारने पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यांची नावे नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण
देवेंद्र फडणवीस: नागपूर
अजित पवार: कोल्हापूर
छगन भुजबळ: अमरावती
सुधीर मुनगंटीवार: चंद्रपूर
राधाकृष्ण विखे पाटील: अहमदनगर
चंद्रकांत पाटील: रायगड
गिरीश महाजन: नाशिक
दादा भुसे: धुळे
गुलाबराव पाटील: जळगाव
दिलीप वळसे पाटील: वाशिम
रविंद्र चव्हाण: ठाणे
संजय बनसोडे: लातूर
अनिल पाटील: बुलढाणा
आदिती तटकरे: पालघर
हसन मुश्रीफ: सोलापूर
दीपक केसरकर: सिंधुदुर्ग
उदय सामंत: रत्नागिरी
अतुल सावे: परभणी
मंगलप्रभात लोढा: मुंबई उपनगर
संदीपान भुमरे: औरंगाबाद
सुरेश खाडे: सांगली
अब्दुल सत्तार: जालना
संजय राठोड: यवतमाळ
धनंजय मुंडे: बीड
विजयकुमार गावित: नंदुरबार
तानाजी सावंत: उस्मानाबाद
शंभूराज देसाई: सातारा
धर्मराव आत्राम: गडचिरोली
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.