Raju Patil : मंत्री रेल्वेरुळावरून चालले, मनसे आमदार म्हणाला, 'बरे झाले...'

MNS Raju Patil : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कोणाल मतदान करणार याचा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मात्र, राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आलेला नाही, असे पाटील म्हणाले.
Raju Patil
Raju Patilsarkarnama
Published on: 
Updated on: 

Raju Patil News : पावसामुळे रेल्वेरुळावरून चालत जात असताना मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर 'बरे झाले एका अर्थाने की आमदार पण रेल्वेरुळावर आले. वर्षानुवर्ष रेल्वे समांतर रस्त्यांची मागणी होत आहे. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. आमदार रेल्वेरुळांवर आल्यावर आता तरी त्यांना प्रवाशांच्या खऱ्या समस्यांची जाणीव झाली असेल', अशा परखड शब्दांत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुनावले.

विधिमंडळ अधिवेशनासाठी 10 ते 12 आमदार हे रेल्वेने येत होते. मात्र,मुंबईत रेल्वेरुळावर पाणी साचल्याने हे आमदार अडकून पडले होते.मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याशिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही रोखण्यात आल्या होत्या.

आमदार राजू पाटील म्हणाले, 2004 साली आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेव्हाचे डोंबिवलीचे आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी रेल्वे समांतर रस्ता असावा ही मागणी केली होती. प्रवासी संघटना मागणी करत आहेत. गेल्या चार वर्षापासून मी याचा सतत पाठपुरावा करतोय. परंतु ती मागणी अजूनही काही पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे अशा वेळेस एक पर्यायी रस्ता असायला हवा. लोकांना तो सोयीचा वाटेल असा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे.

Raju Patil
Video Mumbai Heavy Rain: मुंबईतील पावसाचा फटका आमदारांना; मदत, पुनवर्सन मंत्री अनिल पाटील अडकले ट्रेनमध्ये!

विधान परिषदेला मतदान कोणाला?

विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली आहे.एका एका मताला महत्त्व आले आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कोणाल मतदान करणार याचा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मात्र, राजसाहेब ठाकरे Raj Thackeray यांचा आदेश आलेला नाही. त्यांचा आदेश आल्यानंतर ते सांगितल त्या उमेदवाराला मतदान करणार, असे राजू पाटील यांनी सांगितले.

Raju Patil
Hitendra Thakur News : राजकीय घडामोडींना वेग, हितेंद्र ठाकूर कुणाला पुरवणार रसद ? पवारांपाठोपाठ घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com