Hitendra Thakur News : राजकीय घडामोडींना वेग, हितेंद्र ठाकूर कुणाला पुरवणार रसद ? पवारांपाठोपाठ घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या निवडणूक सुरुवातीला बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने मतदान होणार आहे.
Hitendra Thakur 2.jpg
Hitendra Thakur Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकांनी महाराष्टातलं राजकीय वातावरण तापलं आहे.शिक्षक आणि पदवीधर निवडणूक बरोबरीत सुटल्यानंतर आता 12 जुलैला होत असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

लोकसभेला सपाटून मार खाललेल्या महायुतीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशातच एक मोठी घडामोड समोर आली आहे.

महायुतीने आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठे पावले उचलली आहेत.बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या दालनात गेले आहेत. तिथे त्यांनी सीएम एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.यामुळे ठाकूर यांची भूमिका विधान परिषदेच्या निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे या भेटीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहेत.

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीत ठाकूर यांनी शिंदे, फडणवीस अन् मंत्री रविंद्र चव्हाणांसोबत तासभर मतदारसंघातील व महापालिका स्तरावरील प्रश्नांवर चर्चा केली. विधानपरिषदेच्या मतांसाठी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. पण ठाकूर यांनी महायुतीच्या नेत्यांना आता माझी आठवण काढताय, पुढेही माझी आठवण ठेवा असा इशारा बैठकीनंतर दिला आहे.

विधान परिषदेच्या निवडणूक सुरुवातीला बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने मतदान होणार आहे. 12 जुलैला विधिमंडळात मतदान होणार असून यासाठी महायुतीने 9 तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.या निवडणुकीसाठी मतदान गुप्त स्वरुपाचे असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही.

Hitendra Thakur 2.jpg
Sunil Tatkare News : शरद पवारांची 'हौसे-नवसे-गवसे'ची टिप्पणी अजितदादांना की राहुल गांधींना ? सुनील तटकरे 'कन्फ्यूज'

विधान परिषदेत क्रॉस व्होटिंगची शक्यतादेखील आहे.त्यामुळे कोणाची मते फुटणार याकडे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीतील पराभवामुळे मतदारांत चुकीचा 'मेसेज'जाऊ नये याची दक्षता सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यास येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बॅकफूटवर जावे लागणार आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, आमदार सुनिल राऊत अशा शिवसेनेच्या (Shivsena) पहिल्या फळीतील नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aaghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेवून मदत मागितली होती. मात्र निकालानंतर 3 अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची मत शिवसेनेला मिळाली नाहीत, असे जाहिरपणे सांगून खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती.

Hitendra Thakur 2.jpg
Mehboob Sheikh on Bajrang Sonwane : 'दोन कुटाणे करणाऱ्यापेक्षा, दोन कारखानेवाला कधीही बरा' ; मेहबूब शेख यांचा रोख कुणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com