Jalna Loksabha Constituency : अपक्ष उमेदवाराने पाठिंबा जाहीर केल्याची खोटी पोस्ट, आरोपीवर गुन्हा दाखल..

Political News : अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केल्याची पोस्ट फेसबुकवर व्हायरल करण्यात आली. यानंतर मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली आणि या पाठिंब्याच्या पोस्टची खात्री करून घेण्यासाठी कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला.
 Elections news
Elections news Sarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Chatrpati Sambhajinagar News : लोकसभेच्या जालना मतदारसंघात मतदानासाठी अवघे काही तास राहिले असतांना अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांना पाठिंबा जाहीर केल्याची पोस्ट फेसबुकवर व्हायरल करण्यात आली. यानंतर मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली आणि या पाठिंब्याच्या पोस्टची खात्री करून घेण्यासाठी कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला.

ही बाब अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही पोस्ट खोटी, जुन्या फोटोचा वापर करून दिशाभूल करण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मंगेश साबळे यांनी स्वतः या संदर्भात व्हिडिओ जारी करत खुलासा केला. तसेच ही खोटी पोस्ट टाकणाऱ्या आरोपीविरुद्ध रीतसर पोलीसात तक्रार नोंदवत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalna Loksabha Constituency News)

 Elections news
Dharashiv News : धाराशिव शहराच्या नावामागचा असा आहे रंजक इतिहास; जाणून घ्या अनोखी माहिती

जालना लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी प्रचार संपला. त्यानंतर आज दिवसभर सोशल मिडियाच्या माध्यमातून निवडणुकीची चर्चा रंगली होती. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danvae) विरुद्ध महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तसेच अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.

सोमवारी सकाळी सातवाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी रविवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काळे आणि अपक्ष मंगेश साबळे एकत्र दिसत आहेत. याखालील मजकुरामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पोस्ट नंतर संपुर्ण मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली. अनेकांनी या पोस्टची खातरजमा करण्यासाठी थेट मंगेश साबळे यांना फोन केले. त्यानंतर साबळे यांनी तातडीने या पोस्टबद्दल खुलासा करणारा व्हिडिओ शेअर केला. ही पोस्ट खोटी, जुन्या फोटाचा वापर करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी व्हायरल करण्यात आल्याचे सांगत आपला कुणाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणी साईनाथ बेडके यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल हरिचंद्रे याच्याविरोधात वडोद बाजार पोलिस स्टेशन येथे अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे बोलले जाते.

(Edited By : Sachin Waghmare)

 Elections news
Jalna Politics : 'स्वाभिमानी'ने पाठिंबा देताच कल्याण काळेंचा शेतकऱ्यांना मोठा शब्द; म्हणाले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com