MNS Deepotsav: 'दीपोत्सव' राज ठाकरेंचा अन् क्रेडिट कोण घेतंय, तर फडणवीस सरकार? मनसे संतापली, खरमरीत पोस्ट चर्चेत

MNS vs Fadnavis government : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे साजरा मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला जातो.या दीपोत्सवाचं मुंबईकरांसह राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा असते. पण आता याच दीपोत्सवावरुन मोठा वाद पेटला आहे.
raj thackeray Deepotsav mahayuti .jpg
raj thackeray Deepotsav mahayuti .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे साजरा मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवाचं मुंबईकरांसह राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा असते. विशेष बाब म्हणजे यावर्षीच्या दीपोत्सवाचं उद्घाटन हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण आता मनसेच्या (MNS) याच दीपोत्सवावरुन मोठा वाद पेटला आहे.

शिवाजी पार्कवरील दीपोत्सवावरुन आता मनसे आणि महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. या दीपोत्सवाचं क्रेडिट घेत असल्याचा आरोप करत मनसेनं पर्यटन विभागासह सरकारवरही चांगलीच आगपाखड केली आहे. सोशल मीडियावरील मनसेच्या अधिकृत अकाऊण्टवरुन पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांना टॅग करत पोस्ट करण्यात आली आहे. देसाई यांना दीपोत्सवाच्या श्रेयवादावरुन संतप्त सवालही विचारण्यात आला आहे.

मनसेनं त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात "महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरुन मुंबईतील शिवाजी पार्क मैदान येथील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या, असं मुंबई आणि मुंबईबाहेरील पर्यटकांना आवाहन केल्याचं म्हटलं आहे.

दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे.या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव करत आहे. हा दीपोत्सव जरी मनसे करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं,आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील" असंही मनसेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

raj thackeray Deepotsav mahayuti .jpg
Satej Patil News : सतेज पाटलांच्या नव्या बॉम्बनं महायुतीत खळबळ; म्हणाले,'मुंबईतले प्रोजेक्ट एकाच माणसाला...'

'सरकारच्या मनाचा उमदेपणाही दिसला असता...'

जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग आयोजित करत असल्यासारखं दाखवतं, तेव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता, सरकारच्या मनाचा उमदेपणाही दिसला असता.

परंतु नाशिकमध्येही जे मनसेने केलं, ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली. तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हतं!", असा खोचक टोलाही मनसेनं या पोस्टमधून महायुती सरकारला (Mahayuti Government) लगावला आहे.

raj thackeray Deepotsav mahayuti .jpg
Karuna Munde News : गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस धनंजय मुंडेच,'करूणा' शर्मांकडून नवऱ्याच्या संघर्षाचेही कौतुक!

मनसेनं पुढे पोस्टमध्ये म्हटलंय,आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला होता, दीपोत्सव तर असतोच, पण असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करु, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं!" असा चिमटाही सरकारला मनसेकडून काढण्यात आला आहे.

पर्यटन विभागाची पोस्ट काय..?

राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं मनसेच्या या दीपोत्सवाचे श्रेय लाटण्याचा प्रकार केल्याचा आरोप केला जात आहे.महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील फटाक्यांची आकर्षक आतषबाजी पाहिली नसेल, तर तुम्ही दिवाळीत मुंबईतील उत्कृष्ट जागेला मुकत आहात, असं म्हटलं आहे. पर्यटन खात्याच्या या ट्विटर पोस्टवरुन मनसेनं सरकार आणि पर्यटन विभागाला चांगलंच खडसावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com