Hindi imposition protest : फडणवीसांच्या निर्णयानंतर काही मिनिटांतच राऊतांनीही मोर्चाबाबत केली मोठी घोषणा

Raj Thackeray’s Scheduled Protest Against Hindi Imposition : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीबाबतचे राज्य सरकारचे दोन्ही जीआर रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
MP Sanjay Raut announces the cancellation of Raj Thackeray’s protest march against Hindi language imposition in Maharashtra.
MP Sanjay Raut announces the cancellation of Raj Thackeray’s protest march against Hindi language imposition in Maharashtra. Sarkarnama
Published on
Updated on

Hindi imposition protest : राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली होती. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होणार होते. तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांनीही पाठिंबा जाहीर केला होता. यादरम्यान विधिमंडळाचे अधिवेशनही असल्याने महायुती सरकारने रविवारी मोठी घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीबाबतचे राज्य सरकारचे दोन्ही जीआर रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच मोर्चा रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर काही मिनिटांत राऊतांनी मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले.

संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द. हा मराठी एकजुटीचा विजय. ठाकरे एकत्र येणार याचा धसका. ५ जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही; पण...ठाकरे हाच ब्रँड, असे राऊज यांनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी कंसामध्ये फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान, असे म्हणजे सरकारच्या निर्णयाचे स्वागतही केले आहे.

MP Sanjay Raut announces the cancellation of Raj Thackeray’s protest march against Hindi language imposition in Maharashtra.
Mahayuti Goverment : ठाकरेंच्या दणक्यानंतर महायुती सरकारची माघार; 'हिंदी'बाबत घेतला सर्वात मोठा निर्णय

दरम्यान, ता. 16 जून 2025 चा जीआर व महायुती सरकारने 25 जून 2025 काढलेले दोन्ही जीआर रद्द करण्यात आला असल्याची घोषणा त्यांनी केली. हे जीआर रद्द करून नव्याने त्रिभाषा सूत्र ठरविण्याबाबत नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

MP Sanjay Raut announces the cancellation of Raj Thackeray’s protest march against Hindi language imposition in Maharashtra.
Mahayuti Goverment : ठाकरेंच्या दणक्यानंतर महायुती सरकारची माघार; 'हिंदी'बाबत घेतला सर्वात मोठा निर्णय

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकारमधील सर्वच पक्षांनी या अहवालाला मान्यता दिली आहे. सत्तेत आल्यानंतर स्वीकारायचे सत्तेत नसले की विरोध करायचे ही दुहेरी भूमिका काही पक्षांची आहे. तुम्हीच मान्यता दिली तर कुठल्या तोंडाने विरोध करता, असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवा, अशी टीका फडणवीसांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com