Uday Samant on Mahayuti : मी कुणाच्याही अटींना जुमानत नाही, हे राज ठाकरेंनी दाखवून दिले...

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: Political Ripples : उदय सामंत यांनी देशपांडे यांच्यासोबतच बैठक ही नवी मुंबईतील एका विकासकामांसंदर्भात होती, असे स्पष्ट केले.
Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच या भेटीनंतर मंत्री उदय सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांचीही भेट झाली अन् चर्चांना उधाण आले. या दोन्ही बैठकांबाबत सामंतांनी आपली भूमिका स्पष्ट करताना काही मुद्द्यांवर थेट भाष्य केले.

उदय सामंत यांनी देशपांडे यांच्यासोबतच बैठक ही नवी मुंबईतील एका विकासकामांसंदर्भात होती, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, देशपांडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. पण शिंदे सह्याद्रीला बैठकीला गेल्याने ते भेटू शकले नाहीत. आमच्याशी चर्चा झाली. दोन्ही बैठकांचा काही संबंध नाही, तो योगायोग समजावा, असे सामंतांनी सांगितले.

महायुतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना आहेत. फडणवीस आणि ठाकरेंची भेट आज का होती, हे समजू शकले नाही. राज ठाकरेंच्या संदर्भातील भूमिका एकनाथ शिंदे घेतील. ते महायुतीत आले तर नक्कीच आमचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Local Body Elections : राजकारण आहे भावा! ‘स्थानिक’साठी शत्रूलाच मित्र करण्यासाठी धडपड

मी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते की, यूबीटीने अटींचा सिलसिला सुरू केला होता. राज ठाकरेंनी फडणवीसांना भेटायचे नाही, अमित शहांसोबत संबंध ठेवायचे नाही. त्यावेळीही मी सांगितले होते की, राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. आज राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेऊन मी कुणाच्याही अटींना जुमानत नाही, हे त्यांनी सिध्द केल्याचे सामंत म्हणाले.

मी राज ठाकरेंना तीनदा भेटलो. तिथे खिचडी खाल्ली. युतीची खिचडी ही, त्यामध्ये कोणते साबुदाणे टाकायचे, किती मिरची टाकायची हे तीन नेते ठरवतील. आजच्या दोन्ही बैठका योगायोगाने झाल्या आहेत. आमच्या भेटीत विकासकामांची चर्चा झाली आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात होणार 'करिश्मा', खास कुंभमेळा आयुक्त पदाची नव्याने निर्मिती

राज ठाकरेंनी कधीही सांगितले नाही की मी यूबीटीसोबत जाणार आहे, असा सवाल करत सामंत म्हणाले, राज ठाकरे आपल्यासोबत कधी येतील याबाबत यूबीटीच्या लोकांनाच फार आतुरता लागली आहे. ज्या व्यक्तीसोबत 20-20 वर्षे काही लोकांनी संबंध ठेवला नाही, आता ते महापालिका निवडणुकीसाठी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही सामंत यांनी लगावला. दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याबाबत यूबीटीनेच बॅनरबाजी केली आहे. मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com