Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात होणार 'करिश्मा', खास कुंभमेळा आयुक्त पदाची नव्याने निर्मिती

Karishma Nair appointed as Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Commissioner, new leadership for 2026 planning : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची कुंभमेळा आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे कामकाज सांभाळून नायर यांच्याकडे कुंभमेळा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे.
Karishma Nair
Karishma Nair Sarkarnama
Published on
Updated on

Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela : नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख जाहीर झालेली असून 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळा सुरू होईल आणि 18 महिने चालणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. कुंभमेळ्याच्या कामांना महापालिका व पालिकास्तरावर आात सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याचे नियोजन करताना ते सुसूत्र आणि समन्वयपूर्ण व्हावे म्हणून प्राधिकरणासोबतच स्वतंत्र कुंभमेळा आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची कुंभमेळा आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे कामकाज सांभाळून नायर यांच्याकडे कुंभमेळा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कामाला आता मनुष्यबळ उपलब्ध होऊन अधिक गती मिळणार आहे.

नाशिक- त्रंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्याचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे. या प्राधिकरणाचे नेतृत्व आता करिश्मा नायर या करणार आहेत.

Karishma Nair
Sinhasth Kumbhmela Politics: सिंहस्थाआधीच त्र्यंबकेश्वरला अधिकारी विरुद्ध राजकीय नेत्यांचा छुपा संघर्ष?

याआधी उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये कुंभमेळा पार पडला. तेथेही विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. त्यासोबतच सर्व विभागांमध्ये समन्यव राहावा यादृष्टीने आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली. प्रयागराजच्या धर्तीवरच आता भारतीय प्रशासकीय सेवेतील करिष्मा नायर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी आहे प्राधिकरणाची रचना

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती शासनाने जाहीर केली आहे. प्राधिकरणासह कुंभमेळ्यावर नियंत्रणाची जबाबदारी डॉ. गेडाम यांच्यावर आहे. जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक हे प्राधिकरणात उपाध्यक्ष असतील. यासह अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिद्ध सदस्य) नाशिक शहर पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण), आयुक्त (नाशिक महापालिका), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), मुख्याधिकारी (त्रंबकेश्वर नगरपरिषद), उपायुक्त (नियोजन), विभागीय नियंत्रक (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ), उपसंचालक (आरोग्य), अधीक्षक अभियंता (जलसंपदा गोदावरी नदी व जलव्यवस्थापन), मुख्य अभियंता (बांधकाम विभाग), मुख्य अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), अधीक्षक अभियंता (महावितरण), प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ), सहसंचालक (लेखा व कोषागरे), सहसंचालक (नगररचना), रेल्वे मंडळाचा सदस्य आणि कुंभमेळा आयुक्त अशा २२ जणांचा प्राधिकरणात समावेश आहे.

Karishma Nair
Nashik land scam: पोलीस आयुक्तालयाच्या ३०० कोटींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी चार बिल्डर्सना अटकपूर्व जामीन

यूपीएससीतही 'करिश्मा'

नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दोन्ही पदे भरलेली असताना शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी करिश्मा नायर यांची अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती केलेली आहे. नायर यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेत देशात १४ वी रँक मिळवून ‘आयएएस’ पदाला गवसणी घातली आहे. मूळच्या केरळ राज्यातील पालक्कड येथील रहिवासी आहेत. आता कुंभमेळा आयुक्त म्हणून आणखी एक नवीन जबाबदारी त्यांना मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com