MNS Gudi Padwa Rally Mumbai : अविनाश जाधवांच्या फोटोला फासलं काळ; 'मनसे'त वाद उफळला, कशातून काय घडलं?

Raj Thackeray MNS Gudi Padwa rally Mumbai Avinash Jadhav photo blackened Palghar : मनसे पक्षाचा मुंबईत गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काही वेळातच मार्गदर्शन करणार असतानाच, पालघरमधील नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळ फासण्यात आलं आहे.
Avinash Jadhav
Avinash Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

MNS Party News Today : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्याला काही वेळातच सुरवात होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे आता लक्ष लागलं आहे. राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्यामुळे उत्साहात संचारला आहे.

मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पालघरमधील मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद उफळलाय. पालघरचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळ फासण्यात आलं आहे. पालघरच्या बोईसरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच हा प्रकार केल्याचे समोर येत आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर थोड्याच वेळात तोफ धडाडणार आहे. मनसेच्या राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मुंबईत शिवतीर्थावर दाखल होत आहे.

Avinash Jadhav
Beed district blast news : बीड स्फोटात धक्कादायक अपडेट समोर; आरोपीनं जिलेटीन स्फोटकांबरोबर बनवलं 'रील', कायद्याचे 'तीन-तेरा'?

राज ठाकरे यांच्या मेळाव्याची तयारी करताना मनसेचे (MNS) नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागोजागी बॅनर लावले आहेत. यातून वातावरण निर्मिती केली गेली. पालघरमध्ये देखील जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफळला आहे.

Avinash Jadhav
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी वायनाडमधील महिलांना दिली खास भेट

मनसे कार्यकर्त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळ फासण्यात आलं आहे. पालघरच्या बोईसरमधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनरवरील फोटोला हे काळं फासलं आहे. विशेष म्हणजे, काही मनसे पदाधिकाऱ्यांनीच हे काळं फासल्याची माहिती समोर आली.

विधानसभेपासून वाद

विधानसभा निवडणुकीनंतर मनेसच्या पालघर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद वाढला आहे. पालघरची जबाबदारी अविनाश जाधव यांच्याकडे होती. पण, अविनाश जाधव यांनी कामचं केलं नाही, असा आरोप पदाधिकाऱ्यांचा आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन तक्रार देखील केली होती.

समीर मोरे यांच्यावर हल्ला

यानंतर पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांना मारहाण देखील झाली होती. आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस जणांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला होता. हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होते. या हल्ल्यामागे अविनाश जाधव हेच असल्याचा गंभीर आरोप समीर मोरे यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे.

राज ठाकरेंकडून खरडपट्टी

राज ठाकरे यांनी यानंतर अविनाश जाधव यांची खरडपट्टी काढली होती. हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप समीर मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कायम आहे. आता यातूनच अविनाश जाधव यांच्यावर पालघरमधील कार्यकर्त्यांचा रोष कायम असून, याच रागातून बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com