MNS Marathi language banks : मनसे सैनिकांना बँकांमधील आंदोलनावर पुन्हा 'राज' आदेश; मंत्री सामंतांच्या भेटीची 'जादू चल गयी'?

Raj Thackeray MNS Marathi language banks Maharashtra language rights movement : राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरावर मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आंदोलन थांबवण्याचा आदेश दिला.
Raj Thackeray Uday Samant
Raj Thackeray Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Marathi language protest : राज ठाकरे आपलं कोणतंचं आंदोलन पूर्ण करत नाही, असा त्यांच्यावर विरोधकांकडून नेहमीच आरोप होतो. मराठी भाषेचा आग्रह धरत महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का? हे तपासण्याचा आदेश गुढीपाडवा मेळाव्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला होता.

राज ठाकरे साहेबांचा आदेश म्हटल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवसांपासून, बँकांची झाडाझडती सुरू केली. काही बँकांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्याक केलं. पण आता राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचा आदेश दिला आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर मनसे कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन करणारं पत्र शेअर केलं आहे. हे आवाहन करण्यापूर्वी शिवसेना (Shivsena) मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी हे आवाहन केल्यानं या भेटीत नेमकं काय झालं, याची राजकीय चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray Uday Samant
Chhagan Bhujbal On Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकटेंच्या वादग्रस्त विधानावर दोन प्रश्न; छगन भुजबळांचं उत्तर... (VIDEO)

मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीत काही महत्त्वपूर्ण चर्चा आणि त्यातून निर्णय झाल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषेतील व्यवहारांसाठी सर्व बँकांच्या प्रमुखांबरोबर लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी राज ठाकरे यांना दिल्याचे सांगितले जात आहे. मराठी भाषाची बँकांमधील अंमलबजावणी ही आता सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे कार्यवाही होणार, असे आश्वासन दिल्याचेही कळते.

Raj Thackeray Uday Samant
Yogesh Kadam mobile missing : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना 'बीड'चा झटका; मोबाईल 'मिसिंग' की?

राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन करताना, एक्स खात्यावर शेअर केलेल्या पत्रामध्ये, मनसे सैनिकांनी मराठी भाषेच्या मुद्यावर महाराष्ट्राज जोरदार आवाज उठवल्याबद्दल अभिनंदन. या आंदोलनामुळे बँकांमध्ये बरीत जागृती झाली आहे. मराठी माणसाला कोणी गृहीत धरू शकते, हे देखील कळलं असेल. महाराष्ट्रभर असलेले मनसे संघटनेची ताकद देखील दिसली. आता आंदोलन थांबवा. या विषयांत पुरेशी जागृती झाली आहे. यावर कार्यवाही झाली नाही, तर काय घडू शकते, याची चुणूक देखील दाखवली आहे.

आता जनतेनं मराठीचा आग्रह धरला पाहिजे. आम्ही काय नुसतीच आंदोलन करत राहायची का? आता महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकांचा नियमाची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांमध्ये नियमाची अंमलबजावणी कधी करायची? असा सवाल देखील केला. महाराष्ट्र सैनिकांनी आता हे आंदोलन तूर्तास थांबवावे, पण हाती घेतलेल्या मुद्यांवरून लक्ष हटवू देऊ नका. महाराष्ट्र सैनिक जागा आहे, असे राज ठाकरे यांनी म्हणताना सरकारला इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com