Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या एका घावाने ठाकरे बंधूंमध्ये 'दरार' : एकत्र राहण्यासाठी केलेली युती तुटण्याच्या मार्गावर
Mumbai Municipal Politics : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 'मराठी माणूस' आणि 'मुंबई'च्या हितासाठी एकत्र येत युती केली. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय वर्तुळात या युतीच्या भवितव्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात ठाकरे बंधूंची युती टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने 65 जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व टिकवून ठेवले, तर मनसेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. या संमिश्र निकालांनंतर दोन्ही पक्षांमधील समन्वयाबाबत राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत.
विशेषतः कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने घेतलेली वेगळी भूमिका पाहता, ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काही प्रमाणात अंतर पडत असल्याचे बोलले जात आहे. कल्याण-डोबिंवली महापालिकेत 122 पैकी भाजपला 50, तर शिवसेनेला 53 जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या महायुतीला पालिकेत एकतृतीयांश बहुमत मिळाले.
मात्र निकाल लागताच शिवसेनेने युतीधर्म मोडून आपापला महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या. शिवसेनेने थेट फोडाफोडीला सुरुवात केली. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी शिंदे यांनी मनसेच्या पाच नगरसेवकांचा अधिकृत पाठिंबा मिळवला. दुसरीकडे भाजपनेही पडद्यामागून सूत्रे हलवली मात्र आरक्षणाच्या सोडतीमुळे पक्षाला डाव अर्धवट सोडावा लागला.
गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, अशी सर्वसामान्य शिवसैनिक आणि मराठी मतदारांची भावना होती. त्या भावनेचा आदर करीत ही युती आकारास आली. मात्र, राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्या विस्तारासाठी स्वतंत्र रणनीती आखत असतो. अशातच उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत राजकीय वर्तुळात काही मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.
काही जुन्या राजकीय घडामोडींचा दाखला देत, उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत राज ठाकरे यांना अजूनही जुळवून घेणे अवघड जात आहे. त्यातही राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने, भविष्यात स्वतःचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी ते स्वतंत्र पावले उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे आपली संघटना बांधणी पुन्हा नव्याने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर, दोन्ही बंधूंमधील ही राजकीय जवळीक केवळ निवडणुकीपुरती मर्यादित होती की ती पुढेही कायम राहील, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाकरे बंधू आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

