Akshay Shinde Case : "अक्षयच्या 'एन्काऊंटर'वरून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं दुर्दैव"

Naresh Mhaske On Akshay Shinde Badlapur Case : "जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं-देणं नाही. मात्र...", अशी टीकाही म्हस्केंनी विरोधकांवर केली आहे.
akshay shinde
akshay shindesarkarnama
Published on
Updated on

अक्षय शिंदेच्या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. त्यात अक्षयचा मृत्यू झाला. मात्र, विरोधक कुठलीही माहिती न घेता घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. 'एन्काऊंटर' की हत्या हा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया देत शिवसेना ( शिंदे गट ) खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी कंठस्नान घातले. तळोजा कारागृहातून सोमवारी त्याला ठाण्याला घेऊन येताना अक्षयनं पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावत तीन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर पथकातील दुसऱ्या पोलिसानं अक्षयवर गोळ्या झाडून 'एन्काऊंटर' केला. यानंतर विरोधकांनी शिंदे ( Eknath Shinde ) सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, खासदार म्हस्के यांनी विरोधकांना फैलावर घेतलं आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, "बदलापूर अत्याचारातल्या आरोपीनं पोलिसाची पिस्तूल हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला. पण, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. 'एन्काऊंटर' की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे."

akshay shinde
Akshay shinde news : अक्षय शिंदेंचा 'एन्काउंटर' अन् नाना पटोलेंचे पाच गंभीर प्रश्न

"जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं-देणं नाही. मात्र, अक्षय शिंदे मारला गेला याचं विरोधकांना दु:ख होत आहे. विरोधकांच्या दुट्टपी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे," असं म्हस्केंनी म्हटलं.

akshay shinde
VIDEO : 'एन्काऊंटर'वरून अक्षय शिंदेच्या आईचा पोलिसांवर संताप, संशय अन् प्रश्नांची सरबत्ती

"आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला, तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणी हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली?" असा सवाल म्हस्केंनी विरोधकांना विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Devendra Fadnavis_CJP Protest March
Badlapur gunshot death news
School FIR
Pune Police News
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com