Raj Thackeray News: राज ठाकरेंनी भाकरी फिरवली; मनसेच्या 'या' बड्या नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Kalyan Dombivli MNS : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेने भाकरी फिरवली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीला जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. मात्र, आतापासूनच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्ट्रीने हालचाली सुरू आहेत.

असेच काहीसे चित्र कल्याण-डोंबिवलीमध्ये पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका पाहता डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या जागी आता राहुल कामत यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेने भाकरी फिरवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासंबंधी मोठा निर्णय होणार ? शिंदे - फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

राहुल कामत हे राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत होते, तेव्हापासून राहुल कामत हे त्यांच्यासोबत होते आणि आजही आहेत. येणाऱ्या निवडणुका पाहता त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मनसे आता'ॲक्टिव्ह मोड'वर आलेली दिसत आहे.

दरम्यान, आगामी निवडणुका पाहता भाजपने आतापासूनच जोरदार तयारी केली आहे, तर शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादीचे दोन गट आणि काँग्रेसनेही राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केलेली आहे, तर पक्ष संघटना वाढण्याच्या अनुषंगाने पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आता यामध्ये मनसेनेदेखील पक्षातील पदाधिकाऱ्यांना नव्या जाबाबदाऱ्या देत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Raj Thackeray
Maratha Reservation : पाच हजार मराठा तरुणांच्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी उत्तर देणार का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com