Maratha Reservation News : मराठा आरक्षणासंबंधी मोठा निर्णय होणार ? शिंदे - फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

Eknath Shinde - Devendra Fadnavis Delhi Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत शिंदे- फडणवीसांची बैठक...
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं दसरा मेळाव्यात कौतुक करतानाच त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर दसरा मेळाव्यात आपलं भाषण थांबवत छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका जाहीर केली.

पण तरीदेखील जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर ठाम राहत आरपारची लढाई सुरू केली आहे. आजपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Manoj Jarange Hunger Strike : जरांगेंची आर-पारची लढाई; पाणी नाही, उपचार नाही अन् सलाइनही लावणार नाही...

याचवेळी आता मराठा आरक्षणाच्या घडामोडींना वेग आला आहे. लवकरच मराठा आरक्षणाविषयी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत.

एकीकडे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दिल्लीत शिंदे फडणवीसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तातडीची बैठक होत आहे. या बैठकीत जरांगे पाटलांच्या उपोषणासह मराठा आरक्षणावर ठोस पाऊल घेण्यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणा(Maratha Reservation) साठी बेमुदत आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांची मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, ही आग्रही मागणी आहे. जरांगे पाटलांच्या आजपासून सुरू केलेल्या आताच्या उपोषणात अन्न-पाणी घेणार नाही. सलाइन लावणार नाही, कोणतेही उपचार घेणार नाही, समाजाला न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरू राहील, असे जरांगे पाटील म्हणाले.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Sushma Andhare VS Jyoti Waghmare: फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना शह देणाऱ्या डॉ. ज्योती वाघमारेंना कोणी घडवले माहितीये ?

त्यानंतरही जरांगे आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम राहिले. आजपासून ते पुन्हा एकदा जालनातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करत, सरकारला आर या पारची लढाईचे आव्हान दिले आहे. मराठा आरक्षणासाठी आता राजीनामा अस्त्रास सुरुवात, खेड तालुक्यातील काळूस गावच्या सदस्या प्रियंका खैरेंनी दिला सदस्यपदाचा राजीनामा.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Vidarbha Farmer's News : रविकांत तुपकर कडाडले; म्हणाले, 'त्यांच्या' हत्या करण्यासही मागेपुढे बघू नका !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com