Hitendra Thakur: राजेश पाटलांमुळे गावितांचा पत्ता कट; हितेंद्र ठाकूरांचा महायुतीला टोला

Palghar Lok Sabha Election 2024: "आमचे उमेदवार राजेश पाटील यांच्यासमोर कोणताही उमेदवार टिकणार नाही, म्हणूनच गावित यांचं तिकीट महायुतीने कापलं आहे. शिवाय भारतीय जनता पक्षाने केलेले सगळे सर्वे आमच्या बाजूने आहेत."
Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Palghar Lok Sabha Election 2024: पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट नाकारण्यास आमचे उमेदवार राजेश पाटील (Rajesh Patil) जबाबदार असल्याचं वक्तव्य करत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी महायुतीला टोला लगावला आहे. राजेश पाटलांसमोर कोणताही उमेदवार टिकणार नाही म्हणूनच गावित यांचं तिकीट महायुतीने कापलं असल्याचा दावादेखील ठाकूर यांनी केला आहे.

पालघरच्या (Palghar) जागेवरुन अनेक दिवसांपासून महायुतील भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेंच सुरु होती. शिवाय पालघर लोकसभेचे तिकीट शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनाच द्यावं यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र गावित यांचा पत्ता कट करुन आता ही जागा भाजपला देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने (BJP) दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा (Hemant Savara) यांना इथून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे गावीतांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गावितांना उमेदवारी नाकारताच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ठाकूर म्हणाले, आमचे उमेदवार राजेश पाटील यांच्यासमोर कोणताही उमेदवार टिकणार नाही, म्हणूनच गावित यांचं तिकीट महायुतीने कापलं आहे.

Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
Amol Kolhe On Shivaji Aadhalrao Patil: चला पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही, कोल्हेंनी स्वीकारले आढळरावांचे आव्हान !

शिवाय भारतीय जनता पक्षाने केलेले सगळे सर्वे आमचे उमेदवार राजेश पाटील यांच्या बाजूने आहेत असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज मोठं शक्ती प्रदर्शन करत बहुजन विकास आघाडीने दाखल केला आहे.

पालघरमध्ये हेमंत सावरा यांची लढत ठाकरे गटाच्या भारती कामडी (Bharti Kamadi) यांच्यासोबत असणार आहे. मात्र, पालघर लोकसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचीही चांगली ताकद आहे. बहुजन विकास आघाडीने येथून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने विजया म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे आता पालघरची जनता कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com