KDMC News : 100 रिक्षांना हात केला पण कोणी थांबेना! बाळाला कडेवर घेतलेला पिता हातबल; राजू पाटील संतापले, थेट परिवहन मंत्र्यांना...

Raju Patil Pratap Sarnaik : राजू पाटील यांनी रिक्षाचालकांच्या मनमानी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत एका हतबल पित्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थेट परिवहन मंत्र्यांना आवाहन केले आहे.
Raju Patil
Raju Patilsarkarnama
Published on
Updated on

KDMC News : डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी समोर आली आहे. आपल्या लहान मुलीला कडेवर घेत रिक्षांसाठी हात करणाऱ्या पित्याला रिक्षाचालकांनी प्रतिसादच दिला नाही. तब्बल 100 रिक्षाचालकांना या पित्याने हात केला मात्र कोणी थांबायलाच तयार नव्हते. या हतबल पित्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर माजी आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

डोंबिवली व कल्याणमधील वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी स्थानिक परिस्थितीवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

पाटील यांनी म्हटले आहे की, कल्याण-डोंबिवली परिसरातील परिवहन व्यवस्थापन अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून रिक्षा युनियनच्या दबावामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, नकार देणे, तसेच वाहतुकीचे नियम न पाळणे अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीही अधिकच वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, प्रताप सरनाईक हे पूर्वी डोंबिवलीत वास्तव्यास होते, याची आठवण करून देत पाटील यांनी त्यांना या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. “आपल्याला डोंबिवलीकरांप्रती असलेले प्रेम लक्षात घेता आपण स्वतः येथे येऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आपल्या पद्धतीने झाडाझडती घेऊन सुधारणा करावी,” अशी विनंती राजू पाटील यांनी केली.

Raju Patil
Auto Rickshaw Permit : राज्यातील नवीन रिक्षा परवाना वाटपाला स्थगिती : मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा; संघटनांकडून स्वागत

या ट्विटनंतर डोंबिवली आणि कल्याणमधील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांकडूनही या विषयावर संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. रिक्षा व्यवस्थेवर नियंत्रण, वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी आणि नियोजनबद्ध परिवहन व्यवस्था उभारण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Raju Patil
Pratap Sarnaik News : आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी कक्ष, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com