भुयार असे का वागले? याचे उत्तर अजित पवार अ्न जयंत पाटील देतील!

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला
Devendra Bhuyar Raju Shetty
Devendra Bhuyar Raju Shetty Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलो नाही. आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही, पण कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नावंच सांगितली होती. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांचे नाव राऊत यांनी घेतले होते. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Raju Shetty Latest Marathi News)

राजू शेट्टी यांनी फेसबूक पोस्ट करत म्हटले आहे की ''संजय राऊतजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून केलेला आहात. त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हाकालपट्टी केलेली आहे. तेंव्हा कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका. तो असा का वागला या प्रश्नाच उत्तर तुम्हाला अजित पवार व जयंत पाटील देतील, असे शेट्टी म्हणाले आहेत.

Devendra Bhuyar Raju Shetty
त्यावेळी मला मंत्रीपदाची ऑफर होती; पण... : राऊतांच्या आरोपाला संजय शिंदेंचे उत्तर

भुयार यांच्या बरोबरच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, संजय शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांची मत आम्हाला मिळाली नाहीत. असे संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मविआची ९ मते फुटली आहेत. धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले होते. मात्र महाविकास आघाडीची ९ मते फुटल्याने सहाव्या जागवरचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.

Devendra Bhuyar Raju Shetty
संजय राऊतांमुळेचं भाजपला यश ; गिरीश महाजनांनी सांगितलं विजयाचं गमक

राऊतांच्या आरोपांपवर भुयार म्हणाले...

ब्रम्हदेवालाही ज्या गोष्टी माहिती नाही, त्या संजय राऊतांना कशा काय माहिती झाल्या? अपक्षांचे मतदान हे गुप्त असते. मी उघड उघड मतदान केले. जातानासुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सांगून मतदान केले. मत टाकून परत आल्यानंतरही त्यांना सांगितले की, मी अशा पद्धतीने मतदान केले आहे. गुप्त मतदान पद्धती असतानासुद्धा मी उघडपणे सांगत गेलो आणि मिडीयासमोर येऊनसुद्धा सांगितले की, महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदान केल आहे. तरीही राऊत जे आरोप करीत आहेत, हे सर्व अनाकलनीय आहे, असे भुयार म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com