Maharashtra Politics Latest News : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आणखी एका आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी हे पत्र लिहिले आहे.
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या ( Ram Mandir Ayodhya ) मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी महाराष्ट्रात दारू आणि मांसबंदी करावी. तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करून संपूर्ण देशात दारू आणि मासबंदी करण्याची मागणी करावी, असे आमदार राम कदम यांनी पत्रात म्हटले आहे.
अयोध्येत जवळपास 500 वर्षांनी राम मंदिर उभारण्यात आले आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक करसेवकांनी यातना भोगल्या आहेत. प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला आहे. येत्या 22 जानेवारीला उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या पवित्र दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे, असे राम कदम म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
22 जानेवारी या पवित्र दिवसासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी करण्यात यावी. अशाच प्रकारे दारू आणि मांसबंदी ही देशभरात करावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात यावी, अशी मागणी राम कदम यांनी या पत्रातून केली आहे.
भाजप आमदार राम कदम यांच्याआधी आमदार अतुल अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. 22 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली होती. त्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.
edited by sachin fulpagre
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.