आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी मंत्री झालो नाही

Deepak Kesarkar : घरात बसून राज्य चालवायचं दिवस गेले.
Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest Newssarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नेते आपला पूर्ण वेळ देतात आणि आपलं काम करतात. घरात बसून राज्य चालवायचं दिवस गेले. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) प्रश्नांवर उत्तर द्यायला मी काही मंत्री झालेलो नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. (Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News)

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
योगेश ससाणे राष्ट्रवादी सोडणार; शिंदे गटात जाणार ?

मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर बंडखोर आमदार आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. यामध्ये दोन्हीही बाजूनी एकमेकांवर टीका करण्याची कुणीच संधी सोडत नाही. यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात दिवसेंदिवस दरी वाढतच चालली आहे. यामध्ये सुरूवातीला मवाळ भूमिका घेणारे मंत्री केसकरही आता फ्रंटफूटवर येत ठाकरेंच्या टीकेवर जोरदार बॅटींग करतांनी दिसत आहेत.

आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने बंडखोर गटाला सातत्याने 'गद्दार' असे संबोधत त्यांना हिनवलं आहे. तर त्यांच्यावर वारंवार विविध आरोप केले आहेत. यावर आता शिंदे गटाकडूनही जशास तसे उत्तर देण्यात येत असून टीका करण्यात आहे. आदित्य यांनी नुकतीच केलेली टीकाही त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी ४० गद्दारासाठी मीही कधीकाळी एका मंचावर येत त्यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यामुळे मलाही आता लाज वाटते. तसेत बंडखोर आमदारांनी शिवसेनेसाठी नाही, हिंदूत्वासाठी नाही तर आपल्या स्वार्थासाठी ते गेले आहेत,अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांवर घणाघात केला.

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
शिंदे गटात गेलेल्या 'या' आमदार, मंत्र्यांना सत्ता काही मानवेना...

दरम्यान आज केसरकरांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर बोलायला नकार दिला आणि म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नेते आपला पूर्ण वेळ देतात आणि आपलं काम करतात. घरात बसून राज्य चालवायचं दिवस गेले. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला मी मंत्री झालो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे किती वेळ मंत्रालयात आले आणि आदित्यही किती वेळा आले होते? उद्धवजी आजारी होते पण आदित्य यांच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com