Pankaja Munde Press Conference News: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तसेच पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. तसेच आपण कधीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटलो नाहीत, असं म्हणत पंकजा मुंडेंनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
"पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही. माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला आहेl, त्यामुळे मी कन्फ्यूज आहे. मी गेल्या २० वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यामुळे मला एक-दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्याची गरज आहे. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे", असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिने सुट्टी घेणार असल्याचं भाष्य केलं. तसेच माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा असल्याचंही भाष्य त्यांनी केलं. आता या सर्व विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या भाष्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंकजाताई आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या असून त्या दोन महिने सुट्टी घेणार आहेत. पण जर काही असेल तर त्याच्यांशी संपर्क करत चर्चा करू. यावर मार्ग काढू. पंकजा मुंडे या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या भावना समजून घेतील", असं फडणवीस म्हणाले.
"कसं आहे, विरोधक आपल्याकडे आल्यामुळे सर्वच गोष्टी सर्वांना रुचत नसतात. मान्य होत नसतात. दोन्ही बाजूच्या नेत्यांना हे माहीत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत आल्याने पक्षातील काही नेत्यांना ते स्वीकार करायला वेळ लागेल. मात्र, या सर्व गोष्टींवर आम्ही चर्चेतून मार्ग काढू, पंकजा मुंडे यांच्या मनात काही असेल तर आम्ही जाणून घेऊ. पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.