Rashmi Thackeray News : शिंदेंच्या बंडानंतर रश्मी ठाकरे कल्याणमध्ये शक्तिप्रदर्शन; कारण काय ?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "ठाकरेंची उपस्थिती ठाकरे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी"
Rashmi Thackeray in Kalyan
Rashmi Thackeray in KalyanSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli News : शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंड केल्यानंतर रश्मी ठाकरे ठाणे येथे येऊन गेल्या होत्या. त्यानंतर कल्याण डोंबिवली या शिवसेनेच्या बालेकिल्लात ठाकरे परिवार कधी उपस्थिती लावणार, याची उत्सुकता लागली होती. दरम्यान, ठाकरे गटाकडून आयोजित कार्यक्रमानिमित्त रश्मी ठाकरेंनी शुक्रवारी प्रथमच कल्याणमध्ये आल्या. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. (Latest Political News)

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ (Kalyan) हा शिंदे गटातील बंडखोर आमदार विश्वनाथ भोईर यांचा मतदारसंघ आहे. याच मतदार संघात शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रश्मी ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्या काही बोलल्या नसल्या तरी त्यांची उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा असल्याचे मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटात जोरदार राजकीय आखाडा रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Rashmi Thackeray in Kalyan
Gokul Dudh Sangh : शौमिका महाडिकांच्या रजाच जास्त; गोकुळच्या अध्यक्षांनी हिशोबच केला

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेने (ठाकरे गट)च्या कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यावतीने श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी दुर्गाडी चौकातढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यानंतर शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रतिसाद पाहून रश्मी यांनी उभे राहत महिलांना हात दाखवून प्रतिसाद दिला. 'यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी त्यांची उपस्थिती व त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कल्याण मधील महिला आघाडीतील महिला कार्यकर्त्या या फुटल्या नसून त्या एकनिष्ठ आहेत. आमच्या सांगण्यावरून त्या इथे आल्या याचा आनंद आहे,' असे पोटे म्हणाल्या. (Maharashtra Political News)

दरम्यान, ठाकरे गटातील एका महिला पदाधिकाऱ्याने रंगमंदिर बाहेर ठिय्या मांडत नाराजी व्यक्त केली. त्यांना या कार्यक्रमास आमंत्रित केले नसल्याचा आरोप केला. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढत प्रकरण थंड केले. यावर पोटे म्हणाल्या 'कोणाचीही कोणतीही नाराजी नाही. हा महिला आघाडीचा कार्यक्रम होता. सर्वच महिलांना याची माहिती होती. वैयक्तिक असे कोणाला आमंत्रित केले गेले नव्हते. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही.' यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रवक्ते महेश तपासे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात येऊन रश्मी यांचे कल्याण नगरीत स्वागत केले.

(Edited by Sunil Dhumal)

Rashmi Thackeray in Kalyan
Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात के.कवितांना तात्पुरता दिलासा; ईडीने बजावले होते समन्स

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com