Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात के.कवितांना तात्पुरता दिलासा; ईडीने बजावले होते समन्स

K Kavitha : ईडीच्या आदेशाला आमदार के.कविता यांनी थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
K Kavitha
K KavithaSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के.कविता यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने के.कविता समन्स बजावले होते. तसेच चौकशीसाठी शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ईडीच्या या आदेशाला आमदार के.कविता यांनी थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ईडीने के.कविता यांच्याविरोधातील समन्स २६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची सुनावणी २६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच ईडीनेही के.कविता यांना तोपर्यंत चौकशीसाठी न बोलावण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे के.कविता यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

K Kavitha
Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला ईडीचे समन्स

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने के.कविता यांना समन्स बजावल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये के.कविता यांची याच प्रकरणात'सीबीआय'ने देखील चौकशी केली होती. त्यानंतर ईडीकडून मार्च महिन्यातही आमदार के.कविता यांची चौकशी झाली होती. आता पुन्हा एकदा के.कविता यांना ईडीने समन्स बजावले होते.

सुप्रीम कोर्टात २६ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत काय होतं, हे पाहणे महत्वाचे असून के.कविता यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार, हे सुनावणी नंतरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी ईडीने केलेले सर्व आरोप के.कविता यांनी फेटाळून लावले आहेत.

Edited by - Ganesh Thombare

K Kavitha
Shirdi Politics : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे ? शिवसेना भवनातील बैठकीत नेमकं काय ठरलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com