Mahadev Jankar : महादेव जानकरांना पुन्हा मंत्रिपदाची आशा; भाजपा काय करणार ?

Maharashtra Politics : आम्हाला सन्मानाने वागणूक द्यायला पाहिजे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Rashtriya Samaj Party : राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

"महादेव जानकर तुझी औकात वाढव, तुझे विधान सभेत ५० आमदार आल्यानंतर भाजपवाले मागे पळत सुटतील," असे सांगत जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आम्ही भिकाऱ्यासारखे राहणार नाही, आम्ही छोटे पक्ष आहोत आम्ही पाठिंबा दिल्याने ते सत्तेत आले. आम्हाला सन्मानाने वागणूक द्यायला पाहिजे,"

Mahadev Jankar
Anil Parab News : अटक टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्याची न्यायालयात धाव ; महापालिका अभियंत्याला मारहाण..

"सत्तेत आल्यानंतर कुणाला बरोबर घ्यायचं हे ते ठरविणार. त्यांना त्यांच्या पक्षातील माणूस पाहिजे असतो, त्यामुळे आज त्यांची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे. आम्ही मित्र पक्ष आहोत पण ते मानतात की नाही, माहीत नाही, त्याच्यावर आम्ही नाराज नाही," असे जानकर म्हणाले.

जानकर म्हणाले."भाजपने आम्हाला मंत्री केलं आम्हीही त्यांना मुख्यमंत्री केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी शाहू-फुले- आंबेडकरांची भाषा करतात, पण ते आम्हाला जवळ घेत नाही. पण गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला जवळ घेतलं. पण त्यांनी जी सन्मानाने वागणूक द्यायला हवी होती, ती दिली नाही. आम्ही मित्र पक्ष राजासारखं राहणार आहोत. आम्ही त्यांना म्हणणार नाही, आम्हाला मंत्री करा. महामंडळ द्या, त्यांना गरज असले त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद द्यावे," त्यामुळे जानकरांना पुन्हा मंत्री व्हायचे आहे, हे स्पष्टच आहे.

Mahadev Jankar
Ashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे ; "बळीराजाला चांगले दिवस येऊ दे.."

"आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानकर यांनी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. "विधानसभा, लोकसभेसाठी त्यांनी आम्हाला जागा सोडाव्यात, अन्यथा त्यांना आणि आम्हाला मार्ग मोकळा आहे," असे जानकर म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com