Noel Tata : मोठी बातमी! टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटांची निवड

Noel Tata elected as Chairman of Tata Trust : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समुहाची जबाबदारी कोण सांभाळणार? टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असणार? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Noel Tata
Noel TataSarkarnama
Published on
Updated on

Tata Trust Noel Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समुहाची जबाबदारी कोण सांभाळणार? टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असणार? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

कारण टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नोएल टाटा हे रतन टाटा याचे सावत्र बंधू आहेत. (Noel Tata elected as Chairman of Tata Trust)

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचे वारसदार म्हणून नोएल टाटा यांचं नाव आघाडीवर होतं. अखेर आता तेच टाटा ट्रेस्टचे उत्तराधिकारी असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. नोएल टाटा सध्या ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com