Narayan Rane News : 'नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले, त्यांची खासदारकी रद्द करा..!'; थेट निवडणूक आयोगालाच नोटीस

Vinayak Raut vs Narayan Rane : नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यास आणि मतदान करण्यास बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला दिली आहे. 
 Narayan rane Vinayak raut
Narayan rane Vinayak raut sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यास आणि मतदान करण्यास बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला दिली आहे. 

निवडणुक प्रचार दरम्यान नारायण राणे यांचे समर्थक प्रचार संपलेला असतांना देखील ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे यांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देण्यात येत  असल्याचे व्हिडिओ सर्वत्र वायरल झाल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेत मतदारांना धमकावले की, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही आणि त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचे नाही. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी १३ एप्रिला झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिल्याचा उल्लेख नोटिस मध्ये करण्यात आलेला आहे.

निवडणुक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाही ची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणुक आयोगने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिस मधून केलेली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने सात दिवसात या नोटिस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडणूक जिंकलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल करून आव्हान करणारा असल्याचे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

 Narayan rane Vinayak raut
Rahul Gandhi : 'एनडीएचे लोक I.N.D.I.A च्या संपर्कात, भाजपच्या मित्र पक्षात असंतोष'

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणा मध्ये मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे हे काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत. त्यामुळे  नागरिक म्हणुन देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com