राऊतांची वाणी आणि सेनेची गर्दी : त्यावर अजित पवारांनी उघडपणे ठणकावले

'मी कुठे मास्क काढत नाही. मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Udhav Thackeray हे कोरोनाविरोधी Corona नियमांचे Guidline पालन करतात. तेव्हा ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडलीच पाहिजे, असेही अजित पवार Ajit Pawar यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काही मंडळी उत्साहाच्या भरात लोकांची गर्दीत जमवतात; मुंबईतील मंगळवारच्या गर्दीचा प्रकार घडून कधी तरी गालबोट लागते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना भवनाबाहेरील शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनाकडे बोट दाखविले.

'प्रत्येक मत मांडण्याचे स्वतंत्र असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारी विधाने केली जात असून, ती महाराष्ट्राची परंपरा नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. 'मी कुठे मास्क काढत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाविरोधी नियमांचे पालन करतात. तेव्हा ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडलीच पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
Video: "राज्याचे प्रमुख जे ठरवतील ते होईल", अजित पवार

मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयामधील नव्या केंद्राचे उद्‍घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा, राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांतील गर्दी, राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, त्यातील भाषा, आंदोलन आणि लोकांची गैरसोय या मुद्यांवर आपली भूमिका मांडली.

Ajit Pawar
...तर शिवसेना त्या 'भ@+%' चपलेने मारणार : संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना ललकारले

अजित पवार म्हणाले, "खासदार संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे सरकारचे काम व्यवस्थित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, मुख्यमंत्रक्ष उद्धव ठाकरे यांनी हे सरकार आणले आहे. या नेत्यांच्या भूमिकांनुसार आम्ही काम करतो. मात्र, सरकारमधील घटक पक्षात मतभेद नाहीत, याची काळजी घेतली जाते."

Ajit Pawar
हातात चप्पल घेऊन किरीट सोमय्या राऊतांना म्हणाले..

रायगडचे पालकमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जे काही सुरू आहेत. तो प्रश्न घरातील असून, त्यावर एकत्र येऊन चर्चा होईल आणि मार्ग काढण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. राज्यात परिस्थिती नसल्यानेच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घ्यावे लागले आहे. त्यामुळे विदर्भावर अन्याय होत असल्याचा अर्थ चुकीचा आहे. विदर्भाला पुरेशा प्रमाणात निधी देऊन कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com