Ravindra Chavan: उद्धव ठाकरेंच्या भाजपसोबतच्या वाढत्या जवळीकतेवर रवींद्र चव्हाण यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, शत्रूही...

Ravindra Chavan: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या एका पुस्तकातून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती.
Ravindra Chavan
Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on

Ravindra Chavan: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या एका पुस्तकातून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. फडणवीस हे अत्यंत हुशार आणि बेरकी राजकारणी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच भविष्यात केंद्रातही त्यांना संधी मिळेल अशा शब्दांत त्यांचा कार्यकर्तुत्वाचा गौरव केला होता. तर दुसरीकडं अधिवेशनातही फडणवीस आणि ठाकरे यांची भेटही झाली होती. त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये जवळकी वाढत असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात बोलताना एक महत्वाचं विधान केलं आहे. यासाठी त्यांनी फडणवीसांच्याच एका विधानाचा दाखला दिला आहे.

Ravindra Chavan
Operation Sindoor: पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर संदर्भातील सगळी उत्तरं मिळणार?सोमवारी संसदेत होणार दीर्घ चर्चा

चव्हाण म्हणाले, "हे बदल होणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नेहमीच चांगलं असेल. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा विधानसभेत हे सांगितलंय की, कोणीही पूर्णपणे राजकारणात कायमचा शत्रू नसतो. त्यामुळं टीका करत असताना वैयक्तिक टीका करु नयेत हे वारंवार सांगितलं जातं. मध्यंतरीच्या काळात अतिशय टोकाच्या वैयक्तिक टीका केल्या गेल्या. खरंतर सध्याचं हे वातावरण महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अतिशय चांगलं आहे, असं मलातरी निदान वाटतं. बाकी युती होईल किंवा नाही होईल हा नंतरचा भाग असेल. पण प्रत्येकजण यासाठी चाचपण्याचा प्रयत्न करतो आहे.

Ravindra Chavan
Solapur MLA : ठेकेदारांचे 89 हजार कोटी थकले; तरीही सोलापूरच्या 12 आमदारांनी सुचवली 43 कोटींची कामे

दरम्यान, पण एक गोष्ट फार महत्वाची आहे. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन गोष्टी भाजप फार कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करत असतो. या भूमिकेबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अतिशय घट्टपणे जोडलेले आहेत. आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरेंची भूमिका आणि त्यांच्यासोबत असलेल्यांची भूमिका ही कायम धरसोड पद्धतीची राहिली आहे. त्यामुळं त्याबद्दल त्यांना त्यांची भूमिका तरी स्पष्ट करावी लागेल, त्यानंतर मग काय होईल ते ठरवता येईल, अशा स्पष्ट शब्दांत रविंद्र चव्हाण यांनी भाजप-शिवसेनाच युतीच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com