Narendra Modi : नरेंद्र मोदींबाबत काँग्रेसच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, 2027 मध्ये...

Kumar Ketkar On Narendra Modi : मोदींचा जीव फक्त सत्तेत आणि स्वत:ची प्रतिमा तयार करण्यात अडकला आहे, असं कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.
narendra modi
narendra modinarendra modi

लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा नारा देणारी भाजपचा गाडा '240 वर'च अडकला. संपूर्ण 'एनडीए'ला 294 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला ( Bjp ) स्वबळावर सत्ता आणता आली नाही. मित्रपक्षांच्या साथीनं भाजपनं केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. यातच काँग्रेसचे नेते, कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

2027 मध्ये नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) राष्ट्रपती होतील, असं मोठं विधान कुमार केतकर यांनी केलं आहे. तसेच, मोदींचा जीव फक्त सत्तेत अडकला आहे, असंही केतकर यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात संवाद साधत होते.

कुमार केतकर ( Kumat Ketkar ) म्हणाले, "2027 मध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाचा तिसरा कार्यकाळ संपेल. तेव्हा, मोदी म्हणतील मी आता राष्ट्रपती होतो. थोडक्या मतांनी ते राष्ट्रपदीपदी निवडून आले, तर 2027 ते 2032 असे राष्ट्रपती होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची दिल्लीत सत्ता आली, तरी नरेंद्र मोदी राष्ट्रपती म्हणून असतील."

narendra modi
Modi Government : मोदी सरकार ऑगस्टमध्ये कोसळणार! लालूंनी पेटवली वात...

"हिंदू राष्ट्रात मोदींना फारसं स्वारस्य नाही. हिंदूराष्ट्र हवं आहे. पण, हिंदू राष्ट्राची नेपत्त्य रचना करायची आहे. मात्र, मोदींचा जीव फक्त सत्तेत आणि स्वत:ची प्रतिमा तयार करण्यात अडकला आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी माध्यमांना मॅनेज करणं, पक्ष फोडणे आणि पैसे वाटणे, जे-जे शक्य होईल, ते मोदी करत आहेत," अशी टीका केतकर यांनी केली.

narendra modi
UK Election Results 2024 LIVE : अब की बार 400 पार! जे मोदींना जमलं नाही, ते ‘या’ नेत्यानं करुन दाखवलं...

"लोकसभा, राज्यसभा, एनडीएची बैठक आणि सगळीकडे 'मोदी-मोदी'च्या घोषणा सुरू असतात. याला पुणे-मुंबईतील सुशिक्षित वर्गाकडून पाठिंबा मिळतो. आपल्या देशातील 80 टक्के सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत मध्यमवर्ग मोदींच्या बाजूनं आहे," असं केतकर यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com