Mumbai News : भारतीय रिझव्र्ह बँकने दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केले आले. रिझर्व्ह बँकेने बँकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची आणि बदलण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे पासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. दरम्यान, तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटाबंदीचा निर्णयावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केवळ एकाच वाक्यात आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. आरबीआयच्या या निर्णयाबद्दल विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो काही विचाराअंतीच घेतला असेल," अशी एका वाक्यात प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही बँकेत जाऊन एका दिवशी 2000 रुपयांचे चलन घेऊन 20,000 रुपयांपर्यंत रक्कम बदलू शकणार आहात. तुम्ही तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकता.
तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. ही नोट अजूनही वैध आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून 2000 रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला बँकेत जाऊन 2000 रुपयांच्या जुन्या नोटाही बदलून घ्याव्या लागतील. यासाठी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.