Shivsena UBT Politics : उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवली! शिंदेंच्या शिलेदाराला टक्कर देण्यासाठी आक्रमक नेत्यावर विश्वास! मुंडेंना कल्याण ग्रामीणची जबाबदारी

Rohidas Munde Kalyan Rural Assembly Shivsena : शिवसेनेची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रमक चेहऱ्यांना संधी पक्षाकडून दिली जात आहे.
Rohidas Munde takes charge as the Shiv Sena (UBT) Kalyan Rural Assembly Chief — a significant organizational move by the party.
Rohidas Munde takes charge as the Shiv Sena (UBT) Kalyan Rural Assembly Chief — a significant organizational move by the party.sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : आगामी पालिका निवडणूका लक्षात घेत भाजपने ठाणे जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदांवर नियुक्त्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील कल्याण ग्रामीण भागात भाकरी फिरवली असून रोहिदास मुंडे यांची नियुक्ती कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख म्हणून केली आहे. मुंडे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कल्याण ग्रामीणमध्ये एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे आमदार आहेत. त्यामुळे आक्रमक मुंडे मोरेंना टक्कार देतील, अशी ठाकरेंच्या शिवसैनिकांना विश्वास आहे.

रोहिदास बामा मुंडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला उभारी देण्याचे काम मुंडे यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा येथील शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

Rohidas Munde takes charge as the Shiv Sena (UBT) Kalyan Rural Assembly Chief — a significant organizational move by the party.
Bajrang Sonawane News : परळीत तीन दशकांची सत्ता म्हणूनच हा माज! खासदार बजरंग सोनवणेंचा संताप..

आगामी महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रमक चेहऱ्यांना संधी पक्षाकडून दिली जात आहे. रोहिदास मुंडे यांची आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे त्यांच्या आक्रमकतेचा फायदा पक्षाच्या वाढीसाठी होईल, असे ठाकरे गटाचे पदाधिकारी सांगत आहेत.

रोहिदास मुंडे यांनी सांगितले की, मला जी जबाबदारी पक्षाने दिली आहे ती पार पाडण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेन. त्याचबरोबर महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.

Rohidas Munde takes charge as the Shiv Sena (UBT) Kalyan Rural Assembly Chief — a significant organizational move by the party.
Eknath Shinde : सदस्य नोंदणीचे दीड लाखांचे टार्गेट, पूर्ण करता-करता शिंदे गटाचे नाकीनऊ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com