
Mumbai News : महायुती सरकार स्थापनेला अवघे काही तास उरले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून आजारी असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहबोली मात्र नाराजीच व्यक्त करतेय. भाजपने एकप्रकारे कोंडी केल्याचेच शिंदेंचे मौन सांगत असून, शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीपासून ते आणि त्यांचे नेते देखील लांब दिसत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या या नाराजीवर विरोधकांनी संधी साधत डिवचत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शिंदे यांच्या नाराजीवर कविता करत डिवचलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळाले. या भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. असे असले, तरी निवडणुकांना समोरे जाताना महायुतीत एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरण्यात आला. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात यशस्वी झाली. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदावर पुन्हा संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेण्याचे जवळपास निश्चित केले असून, महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू केली आहे. या सत्तास्थापने पूर्वी महायुतीमधील एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले आहेत.
महायुतीमधील भाजपने (BJP) पाच डिसेंबर ही सत्तास्थापनेची तारीख जाहीर केली असून, शपथविधी तयारी देखील केली आहे. देशातील साधू-संत, अध्यात्मिक गुरू, देशातील 22 मुख्यमंत्री, दोन हजार व्हीव्हीआयपी, लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रणासह 40 हजार लोकं बसतील, असा भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्याची तयारी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात नाराजी असली, तरी ही तयारी भाजपने विनाअडथळा आणि वेगानं सुरू केली आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना गृहमंत्रिपदावर अडून बसली आहे. यावरून ही नाराजी वाढतच आहे. शिवसेनेच्या या नाराजीनाट्यावर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांना डिवचण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. महायुती सरकारच्या सत्तास्थापनेचे शपथविधी अवघ्या काही तासांवर आला असताना देखील एकनाथ शिंदे यांची देहबोली आणि मौन अनेक प्रश्न उपस्थित करत असून, त्यात अधिक नाराजी दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी “राग तुझा कसला? महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?” अशी कविता तयार करुन एकनाथ शिंदे करत डिवचलं आहे.ी
रोहिणी खडसे यांनी ही काविता त्यांच्या समाज माध्यमावर शेअर केली आहे. ही कविता सीएम, लाडकाभाऊएकनाथ आणि लाडकाभाऊ म्हणून टॅग केली आहे. रुसू बाई रुसू, असे या कविताचे शीर्षक आहे.
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू।
आहा… ही ही… हो हो, आता तुमची गट्टी फू!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.