Sassoon News : रुग्णाला निर्जनस्थळी टाकणारा ससूनमधील डॉक्टर निलंबित !

Sassoon Hospital Doctor suspended : सोमवारी मध्यरात्री ससूनमधील डॉक्टरांनी एका बेवारस रूग्णाला विश्रांतवाडी भागात सोडल्याचे समोर आले होते. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
Sassoon Hospital News
Sassoon Hospital NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ससून मध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी ही कारवाई केली आहे.

ससून रुग्णालयात उपचारांसाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. यामध्ये काही बेवारस रुग्णांचाही समावेश असतो. बेवारस असलेल्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना ससूनमधील डॉक्टर रात्रीच्यावेळी निर्जनस्थळी सोडत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि वंचित बहुजन (Vanchit Bahujan) आघाडीचे रितेश गायकवाड यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता. या व्हिडिओमध्ये ससूनमधील डॉक्टर बेवारस रुग्णांना गुपचूपपणे रात्रीच्यावेळी निर्जनस्थळी सोडत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Sassoon Hospital News
धमकी देणारा व्यक्ती वसंत मोरेंशी संबंधित? 'या' नेत्याचं पोलिस आयुक्तांना पत्र

शहरातील बेवारस रुग्णांची दादासाहेब गायकवाड हे सेवा करतात. रस्त्यावर बेवारस स्थितीत आजारी असलेल्या व्यक्तींना ते उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका बेवारस रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याला दुसऱ्या दिवशी पाहण्यासाठी गायकवाड गेले असता तो रुग्ण गायब असल्याचे समोर आले होते.

त्यांनी याची चौकशी केली असता रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले होते पण त्यांनी परत आणले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनी याचा तपास सुरु केला होता. सोमवारी मध्यरात्री अशाच पद्धतीने ससूनमधील डॉक्टरांनी एका रूग्णाला विश्रांतवाडी भागात सोडल्याचे समोर आले होते. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

ससूनमधून बेवारस रुग्णांना अशा पद्धतीने रात्रीच्यावेळी निर्जनस्थळी सोडले जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांची भेट घेत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली होती. झालेला प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर या संबधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे. येरवडा पोलिस (Police) स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Sassoon Hospital News
Prashant Jagtap On Amit Shah : तडीपार अमित शाह यांना पुण्याच्या जगतापांनी, 'असं काही सुनावलं...'

असा झाला प्रकरणाचा उलगडा

ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या बेवारस रुग्णांबाबत काही तरी चुकीचा प्रकार घडत असल्याची खात्री पटल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी रात्रीच्यावेळी ससून परिसरात पाहणी केली. यामध्ये त्यांनी रितेश गायकवाड याची मदत घेतली. रितेशला रिक्षा घेऊन ससूनच्या बाहेर उभे केले. त्यावेळी ससून मधील डॉक्टरांनी त्याला एका रुग्णाला सोडून यायचे आहे, असे सांगितले.

कुठे सोडायचे याची माहिती विचारल्यानंतर 'इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोड असे सांगण्यात आले. त्यावेळी गायकवाड यांनी 'नेमके कुठे सोडू? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत' असे विचारल्यावर संबधित डॉक्टरांनी तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असे सांगितले.

त्यानंतर काही वेळानंतर दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात बसविला. या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले.अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेल्याने रितेश यांनी दादासाहेब गायकवाड यांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती देत गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com