Rohit Pawar On NCP Crisis : केंद्रातील महाशक्तीने पक्ष बळकावला; रोहित पवार भडकले

Sharad Pawar : सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावले असले, तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिले आहे. हा निकाल पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी या निकालानंतर थेट भाजपच्या केंद्रीय नेत्यांना लक्ष करून आपला संताप व्यक्त केला.

रोहित पवार म्हणाले, 'केंद्रातील महाशक्ती सत्तेचा बेलगाम गैरवापर करत आहे. मुख्य पक्षातून फुटलेल्या गटाला व्यक्तीगत स्वार्थासाठी असंवैधानिक निर्णय घेण्यास मदत होत आहे, असा आरोप पवारांनी केला आहे. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावले असले, तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे,' असे म्हणत आगामी निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

Rohit Pawar
Ajit Pawar On NCP : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजप योग्य निर्णय घेण्यात कसे कमी पडते, याकडेही बोट दाखवले. ते म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणे, मंबईचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणे… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय महाशक्तीचा वापर करुनही त्यांना घेता आलेले नाही. यातूनच त्यांची लायकी कळते, असा घणाघातही रोहित पवारांनी भाजपवर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या निकालानंतर पक्षाच्या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो, असे म्हटले. तर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचा पक्ष आणि चिन्ह असल्याचे सांगितले.

हा निकाल लोकशाहीची हत्या करणारा असल्याचे अनिल देशमुखांनी सांगितले. तर या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच पक्षाचा बाप आमच्यासोबत असल्याचे म्हणत लडेंगे और जितेंगे, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar
Election Commission On NCP Crisis : ...अन्यथा शरद पवार गटाला अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्या लागणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com