Rohit Pawar ED Inquiry : शरद पवार आणि रोहित पवारांबद्दल भाजप नेत्याचे मोठे विधान

Rohit Pawar Ed Investigation Pravin Darekar Reaction : रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून राजकारण रंगले...
Sharad Pawar, Rohit Pawar, Pravin Darekar
Sharad Pawar, Rohit Pawar, Pravin DarekarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News Latest :

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप आमदाराने टीका केली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यावर शरद पवारांचा खरा वारसदार मीच आहे असा आत्मविश्वास रोहित पवारांमध्ये आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून दरेकर यांनी ही टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. यावरून सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. 'अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यावर रोहित पवारांना असं वाटतंय की तेच खरे वारसदार आहेत. रोहित पवारांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यावर ते राजकीय नाट्य करत आहेत. आधी Sharad Pawar गेले आणि नंतर आज प्रतिभा पवार पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत. त्यामुळे तेच गादीचे वारसदार आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे', अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

Sharad Pawar, Rohit Pawar, Pravin Darekar
Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची दुसऱ्यांदा 'ईडी' चौकशी'; दादा गटाकडून खिल्ली!

'प्रतिभाताई आमच्या माऊली आहेत'

'शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या रोहित पवारांच्या आजी आहेत. रोहित पवार यांना आजही ईडी चौकशीसाठी बोलावलं आहे. गेल्या वेळेस त्यांना समर्थन करण्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते. आज प्रतिभा पवार या राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार याही पक्षकार्यालयात उपस्थित आहेत. त्यामुळे पूर्ण पवार कुटुंबीय त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. प्रतिभा पवार आमच्या माऊली आहेत. पण रोहित पवारांमुळे त्यांना मोठा मनस्ताप होतोय', असे दरेकर म्हणाले.

'रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी'

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या सगळ्या चौकशा आणि प्रकरण बंद करण्यात आले होते. मात्र आता जेव्हा महायुतीची सत्ता आहे तेव्हा पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांची चौकाशी होत आहे. ईडीने बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित रोहित पवार यांची यापूर्वी 11 तास चौकशी झाली होती. तसेच 1 फेब्रुवारीला चौकशीस हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार यांना 24 तारखेला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी ईडी कार्यालयाचा परिसर आणि राष्ट्रवादी कार्यालयच्या परिसरात जमले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असतानाही नोटीस बजावण्यात येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला. लोकशाही असेल आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिंदे सरकारने हुकूमशाही जाहीर केली नसेल तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलनाला बसू शकतो. हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.

edited by sachin fulpagare

Sharad Pawar, Rohit Pawar, Pravin Darekar
Shikhar Bank Scam Update: अजित पवारांना शिखर बँक घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा; दुसऱ्यांदा 'क्लोजर रिपोर्ट'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com