गणेश नाईकांचा शिंदे गटाला पहिला धक्का; तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल

CM Eknath Shinde| BJP| राज्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारीही आता शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत.
CM Eknath Shinde| BJP|
CM Eknath Shinde| BJP|

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकीकडे राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. राज्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारीही आता शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. असे असताना आता शिंदे गटाला धक्का बसला आहे.

एकीकडे शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचे जोरदार इन्कमिंग सुरू असताना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे.

CM Eknath Shinde| BJP|
हेमंत गोडसे म्हणतात, आम्ही एकनाथ शिंदेंचे खासदार!

शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का दिला. आमदारांनंतर वेगळा गट फोडल्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण नवी मुंबईमध्ये भाजपनेच शिंदे गटाला पहिला धक्का दिला आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजप मध्ये दाखल झाले आहे.

नवी मुंबईत डिसेंबर 2021 मध्ये भाजप नगरसेवकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रांग लावली होती. त्यावेळी भाजपच्या जवळपास 14 नगरसेवक आणि नगरसेविक शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. यावेळी नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हेदेखील शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com