Yogesh Kadam News : विधिमंडळात मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने केली शस्त्र परवान्यासाठी शिफारस! रामदास कदम यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Ramdas Kadam’s Shocking Revelation in Arms License Case : योगेश कदम यांनी आरोपांवर बोलताना सांगितले की, सचिन घायवळ यांना कोर्टाने 2019 मध्ये सर्व गुन्ह्यांत निर्दोष मुक्त केले आहे. मागील दहा वर्षांत म्हणजेच 2015 ते 2025 मध्ये एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
"Ramdas Kadam exposes shocking details about the Sachin Ghaywal arms license case and Yogesh Kadam’s alleged recommendation."
"Ramdas Kadam exposes shocking details about the Sachin Ghaywal arms license case and Yogesh Kadam’s alleged recommendation."Sarkarnama
Published on
Updated on

Who Recommended Sachin Ghaiwal? The Role of Yogesh Kadam Explained : कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहे. हा परवाना नियमानुसारच दिल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे. परवाना दिल्या त्यावेळी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, योगेश कदम यांच्या वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

रामदास कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला. आमदार अनिल परब यांनीही योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, मीही गृह राज्यमंत्री होतो. त्यांनाही अधिकार असतात. एखाद्यावर एकही केस नाही, तो एक शिक्षक, बिल्डर असेल, कोर्टाने क्लिन चिट दिली असेल तर राज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. तुला आणि तुझ्या बापाला विचारून निर्णय घेत नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

विधिमंडळात एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधिमंडळात मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितले. तो व्यक्तीही न्यायाधीश आहे. म्हणून योगेश कदमने निर्णय घेतला. त्या व्यक्तीचे नाव मला घ्यायचे नाही. योगेश कदमने त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ती व्यक्ती उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्यांनी शिफारस केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, असे रामदास कदम यांनी सांगितले.

"Ramdas Kadam exposes shocking details about the Sachin Ghaywal arms license case and Yogesh Kadam’s alleged recommendation."
CJI Gavai attack case : CJI गवईंवरील हल्लाप्रकरणी वकिलाची मोठी कोंडी; चोहोबाजूने कठोर कारवाईचा बडगा...

ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. अशापध्दतीने राज्यमंत्र्यांना आदेश देणे, चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. हा निर्णय माझ्या मुलाने घेतला आहे. त्यामुळे मी नाव घेणार नाही. योगेश कदमच सांगतील. हा विषय त्यांचा आहे. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांना नाव कळवले आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे आणि नाव जाणून घ्यावे, असे रामदास कदम म्हणाले.

"Ramdas Kadam exposes shocking details about the Sachin Ghaywal arms license case and Yogesh Kadam’s alleged recommendation."
Prakash Ambedkar on RSS : CJI गवईंवरील हल्लाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा; म्हणाले, ‘तो’ वकील RSS च्या शाखांमध्ये...

दरम्यान, योगेश कदम यांनी आरोपांवर बोलताना सांगितले की, सचिन घायवळ यांना कोर्टाने 2019 मध्ये सर्व गुन्ह्यांत निर्दोष मुक्त केले आहे. मागील दहा वर्षांत म्हणजेच 2015 ते 2025 मध्ये एकही गुन्हा दाखल झालेला नाही. अपील जी व्यक्ती करते, त्यांचीच माहिती घेतली जाते. त्यामुळे पूर्ण शुध्दीत मी हा निर्णय घेतल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com