Sachin Tendulkar Smile Ambassador: राज्य सरकारकडून सचिन तेंडूलकर यांना मोठी जबाबदारी; थेट 'ब्रँड ॲम्बेसेडर' पदी नियुक्ती

Swachh Mukh Abhiyan Brand Ambassador: पुढील पाच वर्षे सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून काम करणार आहेत.
Sachin Tendulkar as brand ambassador of 'Swachh Mukh Abhiyan'
Sachin Tendulkar as brand ambassador of 'Swachh Mukh Abhiyan'Sarkarnama
Published on
Updated on

Sachin Tendulkar News: मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आज (३० मे) राज्य सरकारच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. (Sachin Tendulkar selected as brand ambassador of 'Swachh Mukh Abhiyan')

Sachin Tendulkar as brand ambassador of 'Swachh Mukh Abhiyan'
Leaders On Balu Dhanorkar: धानोरकरांच्या जाण्याने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी; सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिक्रिया !

वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज (३० मे) सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला. राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Govt.) त्यांची 'स्माइल अ‍ॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय दंत संघटनेने (IDA) तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी आणि चांगल्या मौखिक स्वच्छतेचे महत्त्व भारतीयांना शिक्षित करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुरू केले. पुढील पाच वर्षे सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून काम करणार आहेत.

Sachin Tendulkar as brand ambassador of 'Swachh Mukh Abhiyan'
Gargi Phule Joins NCP: निळू फुले यांची मुलगी, अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादीत करणार प्रवेश

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाच्या सदिच्छादूत पदाची जबाबदारी स्वीकारल्याने या अभियानाला मोठ्या प्रमाणाच प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही यावेळी मंत्री महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. (Girish Mahajan Latest news)

देशात गेल्या काही वर्षात मौखिक कर्करोगात मोठी वाढ झाली आहे. अशा मौखिक आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने या वर्षीपासून ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com