Gargi Phule Joins NCP: निळू फुले यांची मुलगी, अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादीत करणार प्रवेश

NCP News : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
Gargi Nilu Phule
Gargi Nilu PhuleSarkarnama
Published on
Updated on

Nilu Phule's Daughter Gargi Phule Joins NCP: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले या आज (३० मे) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. (Actress Gargi Phule, daughter of Nilu Phule, will join NCP today)

Gargi Nilu Phule
Raj Thackeray Meet Fadnavis: देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्थ'वर 'राज'कीय समीकरणं?

गार्गी फुले यांनी B. A., M. A.in Women Liberation या विषयात पदवीधर आहेत. 1998 पासून त्या प्रायोगिक नाट्य चळवळीशी संबंधित आहेत. तर सत्यदेव दुबे त्यांच्या त्या शिष्याही आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेसह अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Latest Political News)

Gargi Nilu Phule
Chhatrapati Sambhajiraje News: संभाजीराजेंचा गौतमी पाटीलला काल पाठिंबा आज यू टर्न; म्हणाले, अशा 'कले'ला..

गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ (किरण यज्ज्ञपावीत), कोवळी उन्हे (विजय तेंडुलकर), श्रीमंत (विजय तेंडुलकर), सोनाटा (महेश एलकुंचवर), वासंसी जीर्णनी (महेश एलकुंचवर), सुदामा के चावल (वसंत देव), या नाटकात काम केले आहे. (Maharashtra Politics) तर, राजा राणी ची गं जोडी (colors मराठी), सुंदरा मनामध्ये भरली (colors मराठी), तुला पाहते रे (zee टीव्ही), कट्टी बट्टी (zee युवा), या टीव्ही मालिकांमध्ये गार्गी फुलेने काम केले आहे. भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे. याशिवाय नाटकांचेही पोषाखांचे डिझाईनही गार्गी फुले यांनी केलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com