Antilia Bomb Case: साडेपाच वर्षांनंतर बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे तुरुंगाबाहेर येणार? अँटिलिया स्फोटकप्रकरणी NIA कोर्टाचा मोठा निर्णय

NIA Court : मुंबई विशेष न्यायालयानं तब्बल साडेपाच वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयानं प्राथमिक दर्शनी वाझे यांच्याविरुद्ध दहशतवादाचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.
Sachin Vaze Bail
Sachin Vaze BailSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण प्रचंड गाजलेलं आणि तितकंच वादग्रस्त राहिलं होतं. या प्रकरणांमधील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर साडे चार वर्षांनंतर अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, परंतु इतर गुन्ह्यांचे आरोप असल्यानं वाझे तत्काळ तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे.

मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयानं मंगळवारी(ता.29 सप्टेंबर) अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा वाझेला हा जामीन दीर्घ तुरुंगवासाच्या धर्तीवर मंजूर केला आहे.

मुंबई विशेष न्यायालयानं तब्बल साडेपाच वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयानं प्रथमदर्शनी या घटनेनंतर अंबानी कुटुंब दहशतीखाली आलं नाही. त्यामुळे वाझे याच्याविरोधात दहशतवादाचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.

दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या 'अँटिलिया' बाहेर 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या 'अँटिलिया'बाहेर स्फोटकांनी (जिलेटिनच्या कांड्या) भरलेली एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली एसयूव्ही आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.

Sachin Vaze Bail
Thane Politics: शिवसेनेच्या मातब्बर मंत्र्यालाच ‘काऊंटर’ करण्यासाठी नवी 'फिल्डिंग'? एकनाथ शिंदेंच्या 'आशीर्वादा'नं ठाण्यात नवी राजकीय समीकरणं?

या प्रकरणाचा तपास सुरू असताना 5 मार्च 2021 रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत संशयित रित्या सापडला होता.यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याचप्रकरणी एनआयएनं तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझेला अटक केली होती. अटकेनंतर त्याला पोलीस सेवेतून बडतर्फही करण्यात आले होते.या प्रकरणी वाझेनंतर प्रदीप शर्मा, सुनील माने, रियाजुद्दीन काजी यांच्यासह इतर काही जणांनाही अटक करण्यात आली होती.

अँटिलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती (किंवा त्यांच्याकडे ती होती).या प्रकरणाचा तपास सुरू असताना 5 मार्च 2021 रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत संशयित रित्या सापडला होता. मनसुख हिरेन हे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करू शकतील, या भीतीनेच सचिन वाझे आणि इतर सहकाऱ्यांनी हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

Sachin Vaze Bail
BJP News : नवी मुंबईनंतर पनवेल महापालिकेची उधळपट्टी; वर्धापनदिनच वादाच्या भोवऱ्यात? विरोधी पक्ष नेत्याचे गंभीर आरोप

मनसुख हिरेन हे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करू शकतील, या भीतीनेच सचिन वाझे आणि इतर सहकाऱ्यांनी हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या साडेपाच वर्षांनंतर अखेर न्यायालयीन कोठडीनंतर वाझेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com