चांदीवाल समितीसमोर जाताना असं काय घडलं? वाझेची न्यायालयात धाव

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांची समितीकडून चौकशी केली जात आहे.
Sachin Waze
Sachin WazeSarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीकडून देशमुख, परमबीरसिंह आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची चौकशी केली जात आहे.

चौकशीला जात असताना नुकतेच वाझेच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. पण त्यानंतरही त्याला रुग्णालयात नेण्यात आले नाही. त्यामुळे आता वाझेने न्यायालयात धाव घेतली आहे. आजारपणाचे कारण पुढे करत त्याने घरचे जेवण व फिजिओथेरपीसाठी परवानगी मागितली आहे. वाझेवर दोन महिन्यांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. वाझेला डॉक्टरांनी नियमित फिजिओथेरपी आणि उच्च प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिल्याचे याचिकेत म्हटलं आहे.

Sachin Waze
शंभर कोटींची वसुली सांगितली का? वाझेनं अखेर देशमुखांसमोरच दिलं उत्तर

कैद्यांना ही सवलत दिली जात नाही. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. वाझेला मागील सुनावणीवेळी घरच्या जेवणाला परवानगी जरी दिली असली, तरी त्याला घरातून पाठवलेली अंडी आणि मांसाहार खाण्यास मनाई आहे. त्यासाठी वाझेने न्यायालयात अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे कारागृहात दाढी करण्यासाठी एकच वस्तरा वापरला जात असल्याचे सांगत त्याने खाजगी ट्रिमर वापरण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही याचिकेत केली आहे.

ता. 8 डिसेंबर रोजी चौकशीसाठी नेले जात असताना वाझेला छातीत तीव्र वेदना आणि चक्कर येत होती. पण त्यानंतरही त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पुन्हा तुरुंगात आणण्यात आले. त्यामुळे वाझेने खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मागितली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चांदीवाल समितीसमोर अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची मंगळवारी समोरासमोर झाडाझडती घेण्यात आली. देशमुख याच्याकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून कोणती डिमांड करण्यात आली होती का? यावर वाझेने नाही, असे उत्तर दिले. देशमुखांकडून अधिकृत किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीनी पैशांची डिमांड केलेली नव्हती, असेही त्याने स्पष्ट केले. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातून बारमालकांकडून पैसे उकळण्यास करण्यास सांगितल्याचे आठवत नाही, असेही त्याने सांगितले. बार मालकांकडून पैसे उकळल्याचाही वाझेने इन्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com