sadashiv lokhande bhanudas murkute.jpg
sadashiv lokhande bhanudas murkute.jpgsarkarnama

Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंची विधानसभेसाठी मुंबईत चाचपणी? भानुदास मुरकुटेंची जुळवाजुळव गुलदस्त्यात

Sadashiv Lokhande Meet Bhanudas Murkute : माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे हे दोघे मुंबईमधील पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या आवारात एकत्र दिसले. या दोघांमध्ये गप्पांचा फड रंगला होता.
Published on

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी चाचपणी करत आहेत. त्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी 'फिल्डिंग' देखील सुरू केली आहे.

मुंबईमधील पावसाळी अधिवेशनाच्या काळात त्यांचा वावर तेच दर्शवित होता. याचवेळी त्यांच्याबरोबर श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) देखील होते. या दोघांमध्ये विधिमंडळामधील पोर्चमध्ये गप्पांचा फड रंगला होता. आगामी विधानसभाचे राजकारण कसे असेल, असाच अंदाज हे दोघे घेत होते.

शिर्डी ( Shirdi ) लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ( Shivsena ) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात समोरासमोर लढत झाली. ठाकरे यांच्याकडून भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले. सदाशिव लोखंडे यांची हॅट्ट्रिकची संधी हुकली. यानंतर सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून चाचणी केली सुरू केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. त्यानुसार ते मतदारसंघात 'अॅक्टिव' देखील झाले आहेत. विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सदाशिव लोखंडे यांनी मुंबईत श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केल्याचे सांगितले जाते.

सदाशिव लोखंडे यांच्याबरोबर यावेळेस माजी आमदार भानुदास मुरखडे हे देखील होते. माजी आमदार मुरकुटे यांनी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. महायुतीच्या उमेदवाराचे त्यांनी काम केले होते. ते देखील आता विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ते मुंबई विविध वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या विधानसभा निवडणुकीत भानुदास मुरकुटे नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर बरेच राजकीय गणितं अवलंबून आहेत.

sadashiv lokhande bhanudas murkute.jpg
Kishor Darade Vs Vivek Kolhe : किशोर दराडे जिंकले, चर्चा मात्र विवेक कोल्हेंच्या दमदार लढतीची

यातच हे दोघे नेते विधिमंडळात एकत्र आले. त्यामुळे हे दोघे नेते मुंबईतून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे राजकीय गणित आखत तर नाही ना, अशी चर्चा आहे. सदाशिव लोखंडे यांचे राजकारण शांत संयमी असे आहे. तर भानुदास मुरकुटे यांचे राजकारण आक्रमक असते. त्यामुळे हे दोघे नेते एकत्र येणे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय गणितांना कलाटणी मिळण्यासारखेच असल्याचे बोलले जाते. हे दोघे नेते मुंबईत एकत्र दिसले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देखील हे एकत्र होते. विधानसभा निवडणुकीला हे दोघे नेते एकत्र असतील की नसतील ते देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

sadashiv lokhande bhanudas murkute.jpg
Bhausaheb Wakchaure : खासदार वाकचौरे यांच्या महसूल बैठकीत शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं...

सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सहकार्याचं राजकारण केलं. नगर जिल्ह्यामधील संस्थानिकांबरोबर त्यांनी नेहमी जुळवून घेतलं. भानुदास मुरकुटे हे देखील सहकार क्षेत्रातील आणि संस्थानिक आहेत. या दोघांचे उत्तरेतील पाणी प्रश्नावर नेहमीच सहमतीचे राजकारण राहिले. लोकसभा निवडणुकीत ते प्रकर्षाने जाणवले. असे असले तरी सदाशिव लोखंडे यांचा पराभव भानुदास मुरकुटे रोखू शकले नाही. या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे 'माप' पडते आणि कोण 'विजयी' होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com