Subhash Desai News : भूषणने पक्ष सोडल्याचे दुःख; पण काहीच फरक पडणार नाही, सुभाष देसाई म्हणाले...

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंची 'वॉशिंग मशीन' म्हणत राज्य सरकारवर टीका
Subhash Desai, Bhushan Desai
Subhash Desai, Bhushan DesaiSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group : ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू, माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. विश्वासू नेत्याच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्याने हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

भूषण यांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला 'वॉशिंग मशीन' म्हणत टीका केली. तसेच भूषण देसाईंचा पक्षाशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे ते कुठेही गेले तरी ठाकरे गटाला काही फरक पडणार नाही, असे स्पष्ट भाष्यही त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर भूषण यांचे वडील ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी या प्रवेशाचे दुःख झाल्याची भावना व्यक्त केली.

सुभाष देसाई म्हणाले, "माझा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) याने आज शिंदे गटात प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे." यानंतर या प्रवेशाचा ठाकरे गटावर काही फरक पडणार नसल्याचेही स्पष्ट केले. देसाई म्हणाले, "भूषणचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही."

Subhash Desai, Bhushan Desai
Subhash Desai News : देसाईंनी गिरावला खासदार किर्तीकरांचा कित्ता? ठाकरेंना पुन्हा धक्का : निष्ठावंतांची घर का फुटताहेत!

भूषण शिवसेनेत गेला तर माझी निष्ठा कायम मातोश्रीवर असणार असल्याचेही देसाई (Subhash Desai) यांनी सांगितले. देसाई म्हणाले, "शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे."

Subhash Desai, Bhushan Desai
Shivsena News : एमआयएमला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, नामांतराच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्तांना पत्र..

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई म्हणाले, "एकनाथ शिंदे (Eknath Shinnde) यांच्या कामावर प्रेरीत होऊन आपण हा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी आधीपासून काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत आवडल्यामुळे मी हा निर्णय घेतला. मी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, हा माझा स्वतंत्र निर्णय आहे", असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com