Srinivas Vanaga : शिंदेंसाठी ठाकरेंची साथ सोडली, तरी दोनदा तिकीट कापलं, उद्विग्न वनगा 15 तासांपासून 'नॉट रिचेबल'

Palghar Assembly Constituency: पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी डावलल्याने ते नैराश्यात होते. शिवाय तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आपली नाराजी उघड बोलून दाखवली होती.
Eknath Shinde, Srinivas Vanaga , Uddhav thackeray
Eknath Shinde, Srinivas Vanaga , Uddhav thackeraySarkarnama
Published on
Updated on

Palghar News, 29 Oct : पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) यांना पालघर विधानसभेची उमेदवारी डावलल्याने ते नैराश्यात होते. शिवाय तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील आपली नाराजी उघड बोलून दाखवली होती.

तसंच आपण शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून मोठी चूक केल्याची जाहीर कबुली त्यांनी माध्यमांसमोर दिली होती. अशातच आता वनगा कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

ते कुटुंबीयांना काहीही न सांगता घराबाहेर पडले असून त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते नेमके कुठे गेले याबाबतची माहिती कोणालाही नसून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

Eknath Shinde, Srinivas Vanaga , Uddhav thackeray
Uddhav Thackeray News: ठाकरेंनी शिंदे गटावर मुंबईत पहिला मोठा डाव टाकला; कीर्तीकरांच्या मुलालाच दिली उमेदवारी

नेमकं काय घडलं?

सोमवारी भारतीय जनता पक्षाची (BJP) चौथी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकनाथ शिंदेंकडे असलेल्या पालघरच्या जागेवर भाजपने राजेंद्र गावीत (Rajendra Gavit) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलल्याचं उघड झालं. त्यामुळे वनगा प्रचंड नाराज झाले होते. माध्यमांशी बोलताना ते ढसाढसा रडले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com