संभाजीराजेंकडून मतांची जुळवाजुळव सुरू; राऊतांनी उद्धव ठाकरेंची ‘मन की बात’ सांगितली

संभाजीराजे यांनी शिवसेनेची उमेदवारी नाकारल्याचे समजते.
Uddhav Thaceray-Sambhajiraje
Uddhav Thaceray-SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्यास त्यांनी नकार दिला असून अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे समजते. तर दुसरीकडे शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यामुळे आता या निवडणुकीचा पेच वाढतच चालल्याचे दिसते. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News)

संभाजीराजे यांना शिवसेनेची ऑफर स्वीकारण्यासाठी सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आली होती. पण ही वेळ उलटून गेल्यानंतरही संभाजीराजे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उलट ते पहाटेच मुंबईतून कोल्हापूरला गेल्याचे समजते. त्यामुळे आता ते राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

Uddhav Thaceray-Sambhajiraje
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली? पहाटेच सोडली मुंबई

शिवसेना (Shiv Sena) नव्हे तर महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून अपक्ष निवडणूक लढविण्याची संधी द्यावी, यावर संभाजीराजे ठाम आहेत. कुठल्याही पक्षात गेल्यास मराठा समाज दुखावला जाईल, समाजासाठी संघटना काढली आहे, पक्ष नाही, अशी त्यांची भूमिका आहे. पण सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत आपल्या परीने मतांची जुळवाजुळवही सुरू केल्याची माहिती आहे.

राऊतांनी सांगितली ठाकरेंच्या 'मन की बात'

संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू, अशी शिवसेनेची भूमिका आहे. संभाजीराजे यांनी निवडून येण्यासाठी 42 मतांची बेगमी केली असणार, त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असेल. ते स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. पण अशा लक्षात येतंय की त्यांच्याकडे मतं नाहीत. म्हणून ते आमच्याकडे आले. पण आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही.

Uddhav Thaceray-Sambhajiraje
संभाजीराजेंचा शिवबंधनास नकारच शक्य! शिवसेनेच्या `प्लॅन बी` मध्ये ही तीन नावे!!

आम्ही त्यांना शिवसेनेत येऊन पक्षाचे उमेदवार व्हा, असं सांगितलं. राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणं आम्हाला गरजेचं आहे. तुम्ही एक पाऊल पुढे जा, आम्ही दोन पावले मागे जाऊ. तुम्ही छत्रपती आहात. आता निर्णय त्यांचा आहे. पण कोणत्याही परिस्थितीत दोन उमदेवार हे शिवसेनेचेच निवडून जातील. ते पक्के शिवसैनिक असतील. हे मी उद्धव ठाकरे यांच्यावतीनं सांगत आहे. ही त्यांच्या 'मन की बात' आहे. आमच्यासोबत कुणाला यायचं असेल तर आम्ही विचार करू. आमचा संभाजीराजेंना विरोध नाही. संभाजीराजेंकडे 42 मतांचा कोटा असेल तर ते निवडून येतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com