कॅप्टनने आधीही पक्ष काढला होता अन् मिळाली फक्त 856 मते!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंगू सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यात पुन्हा जोरदार वाद सुरू झाला आहे.
Amarinder Singh
Amarinder SinghFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा आज केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंगू सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. याला सिद्धू यांनीही उत्तर दिल्याने वाद पेटला आहे.

कॅप्टन यांनी आधीही पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली होती, याची आठवण सिद्धू यांनी करून दिली आहे. सिद्धू म्हणाले की, मला पक्षाचे दरवाजे बंद करण्याची कॅप्टनची इच्छा होती. जनतेसाठी आणि सत्यासाठी लढणारा मीच आहे. मागील वेळी तुम्ही पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी तुमचा पराभव झाला होता. तुम्हाला फक्त 856 मते मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी पंजाबमधील जनता वाटच पाहत आहे.

काँग्रेसच्या 78 आमदारांनी कधीही असा विचार केला नव्हता. सक्त वसुली संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणि भाजपचा निष्ठावंत असलेला पंजाबचा मुख्यमंत्री स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी पंजाबचे हितच विकेल. पंजाबमधील विकास आणि न्यायाला बाधा आणणारी तुम्ही सर्वांत मोठी नकारात्मक शक्ती होता, असा टोला सिद्धू यांनी लगावला आहे.

Amarinder Singh
कॅप्टन अमरिंदरसिंगांनी काढली सिद्धूंची अक्कल

कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले की, सिद्धू यांना काही माहिती नाही. ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही. मी कधीही अमित शहा आणि धिंडसा यांच्याशी बोललो नव्हतो. परंतु, मी लवकरच त्यांच्याशी बोलणार आहे. काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्ष यांच्या विरोधात भक्कम आघाडी करणार आहे. सिद्धू जिथून लढेल तिथे आम्ही विरोधात उतरू. सिद्धू आल्यापासून काँग्रेसची लोकप्रियता 25 टक्के घसरल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Amarinder Singh
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नवीन पक्ष अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीचा योग

पक्षाच्या स्थापनेची घोषणा करताना कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले की, आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर या नेत्यांची नावे आम्ही जाहीर करू. पंजाबमधील सर्वच्या सर्व 117 जागा आमचा पक्ष लढवेल. आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचे उत्तर तुम्हाला आगामी काळात मिळेल. पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच होईल. कारण आमचे वकील निवडणूक आयोगासोबत या संदर्भात चर्चा करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com