वानखेडे प्रकरण शेकणार? राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलीस महासंचाकांना नोटीस

समीर वानखेडेंच्या बाबतीत नवाब मलिक हे रोज यात नवनवीन बाबी समोर आणत आहेत.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक हे रोज यात नवनवीन धक्कादायक बाबी समोर आणत आहेत. या प्रकरणात आता वानखेडे यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.

याबाबत बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले की, वानखेडेंच्या नातेवाईकांनी माझी भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील मंत्री दररोज टीव्ही येऊन बदनामी करण्यासोबत चुकीची भाषा वापरत आहेत, अशी तक्रार त्यांनी माझ्याकडे केली आहे. यामुळे त्यांच्या समुदायाच्या भावना दुखावल्या जात असून, अवमान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वानखेडे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आमच्या अधिकाऱ्यांना या तक्रारीवर कार्यवाही करण्यास मी सांगितले आहे. याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावण्याच्या सूचना आजच केल्या आहेत. या तक्रारीत तथ्य आढळल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल, असेही सांपला यांनी स्पष्ट केले.

Sameer Wankhede
वानखेडेंना अडचणीत आणणारा साईल पुन्हा एनसीबीच्या कार्यालयात

वानखेडे यांनी नुकतीच दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली होते. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.

Sameer Wankhede
अभिनेत्रीचा भाजपला दे धक्का! सात महिन्यांतच पक्षाला सोडचिठ्ठी

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला होता. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती. हलदर म्हणाले होते की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com