Sameer Wankhede News : समीर वानखेडे भाजप तिकिटावर लोकसभा लढणार?

Sameer Wankhede News : वानखेडे म्हणाले, "मी या गोष्टीला नाकारतही नाही. उद्या माझ्यासोबत काय होऊ शकतं.."
Sameer Wankhede News
Sameer Wankhede NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : क्रूज ड्रग्ज कारवाईप्रकरणी चर्चेत आलेले आणि बॉलिवूड अभिनेते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केलेले एनसीबीचे माजी नोडल अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वानखेडे आता राजकारणाच्या मैदानात उतरणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नुकतेच त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य करत लोकसभेच्या अनुषंगाने सूचक विधान केले आहे. (Washim Yawatmal Lok Sabha News)

Sameer Wankhede News
Sameer Wankhede : समीर वानखेडेंसंदर्भात मोठी बातमी; 'या' गुन्ह्याची नोंद, वानखेडेंना क्रूझ ड्रग्ज प्रकरण भोवणार?

वाशिम - यवतमाळ लोकसभेच्या जागेवरून समीर वानखेडे यांची भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची इच्छा आहे का? असा प्रश्न वानखेडे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना वानखेडे यांनी स्पष्टेपणे नकार दिलेला नाही. त्यामुळे आता लोकसभेच्या रिंगणात समीर वानखेडे येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भाजपकडून वाशीम - यवतमाळ लोकसभेच्या जागेवरून समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वानखेडे म्हणाले, "यावर मी काय प्रतिक्रिया देऊ? उद्या काय होणार? हे कोणालाच माहिती नाही. मी या गोष्टीला नाकारतही नाही. उद्या माझ्यासोबत काय होऊ शकतं, हे फक्त ईश्वराला माहिती आहे."

Sameer Wankhede News
PM Modi to Visit Yavatmal: असा आहे पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा; सहा प्रकल्पांचे लोकार्पण

'यवतमाळ वाशीम लोकसभेच्या जागेवर खासदार भावना गवळी दावेदार आहेत म्हणून तुमची अडचण होते का?' या प्रश्नावर वानखेडे म्हणाले, "हे फार मोठे-मोठे लोक आहेत. माझा नाव यांच्यामध्ये कसं काय येतं? मी याबाबत काही विचार करत नाही. मी तूर्त तरी अॅडिशनल कमिशनर म्हणून चेन्नईमध्ये कार्यरत आहे. मी उद्या काही निर्णय घेतला तर त्याप्रमाणे पुढे जाईन."

वाशीम - यवतमाळमध्ये सामाजिक कार्य -

वाशीम यवतमाळमध्ये समीर वानखेडे (Sammer Wankhede) आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सामाजिक कार्याला लोकसभेच्या अनुषंगाने सुरुवात केली का? या प्रश्नावर वानखेडे म्हणाले, "मी सामाजिक कार्य लहानपणापासून करत आलो आहे. मी सहा महिन्यांत दोन तीन वेळा माझ्या गावी जातो. त्यात मीडियाने मला त्यावेळी कव्हर केले नाही. यात माझी चुकी नाही. "

मोदी हिरो तर अमित शाह आदर्श -

याच मुलाखतीत समीर वानखेडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देशाचे हिरो असे म्हटले आहे, तर देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना ते माझे आदर्श असल्याचा उल्लेख केला आहे.

(Latest Political News)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com