होय, निकाहनामा खराच! क्रांती रेडकरचा मलिकांवर पलटवार

मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामा सार्वजनिक केला.
Nawab Malik - Kranti Redkar
Nawab Malik - Kranti Redkar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा पहिला विवाह अन् धर्मांतराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून वानखेडे यांच्यासह त्यांच्या वडिलांनीही निकाहनामा (Nikahnama) खरा असल्याचे सांगितले आहे. समीर यांची पत्नी क्रांती रेडकरनेही (Kranti Redkar) निकाहनामा खरा असल्याचे म्हटले आहे. पण समीर हे त्यावेळीही हिंदूच होते, असंही क्रांतीने स्पष्ट केलं आहे.

मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामा सार्वजनिक केला. त्यावर माध्यमांशी बोलताना क्रांती म्हणाली, निकाहनामा खरा आहे. निकाह झाला असला तरी समीर यांनी कायदेशीररीत्या धरर्म जात बदलली नव्हती. माझ्या सासु मुस्लिम होत्या, त्यांच्या आनंदासाठी निकाह करण्यात आला. मलिकांनी दिलेला समीर यांचा जन्मदाखला चुकीचा असल्याचा दावाही क्रांती हिने केला आहे.

Nawab Malik - Kranti Redkar
ज्ञानदेव वानखेडेंची कबुली; निकाहनामा खरा पण...

मलिकांवर टीका करताना क्रांती म्हणाली की, नवाब मलिक आमचे खासगी फोटो सार्वजनिक करून त्यांनी घेतेलल्या संविधानिक शपथेचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू. समीर वानखेडे यांना त्यांच्या पदावरून हटवणं, हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. त्यांचा जावई यातून सुटावा यातून हे करत असल्याचा आरोप क्रांतीने केला.

दरम्यान, समीर वानखेडे व शबाना यांचा 2006 मध्ये विवाह लावलेले काझी मुझंम्मिल अहमद माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी समीर हे लग्नावेळी मुस्लिमच होते, असं स्पष्ट केलं आहे. ते मुस्लिम नसते तर विवाह झालाच नसता, असा खुलासाही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, निकाहवेळी समीर हे मुस्लिम असल्याचे सांगत होते, ते मुस्लिम होते. आज जर ते हिंदू असल्याचे सांगत असतील तर ते खोटं बोलत आहेत. समीरच्या नावासमोर सही आहे.

मुस्लिम मुलीसोबत निकाह होत होता. म्हणून तर आम्ही लग्न लावलं. वडीलांनी दाऊदच नाव सांगितले होते. त्यानुसार निकाहनाम्यात तसंच नाव आहे. समीरसह वकील व साक्षीदारांचीही त्यावर सही आहे. जर मुलगा किंवा मुलगी हिंदू असती तर निकाह झालाच नसता. आम्ही लग्न लावलंच नसतं. त्यांनी हिंदू सांगितले असते तर विवाह झाला नसता. सर्व मुस्लिम होते. निकाहनामाही खरा आहे, असा दावा काझी अहमद यांनी केला आहे. निकाह धुमधडाक्यात झाला होता. सुमार दोन हजार लोकांना निमंत्रण होतं, असंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com