Thane Politics : आरोग्य मंदिरांमुळे राजकीय वाद! आमदार संजय केळकरांच्या 'रियलिटी चेक'नंतर शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार

Sanjay Kelkar vs Eknath Shinde Shiv Sena : महायुतीमधील मित्र पक्ष भाजप आणि शिवसेनेत ठाण्याच्या राजकारणात धुसफूस सुरू आहे. संजय केळकर यांच्यावर माजी नगरसेविका मालती पाटील यांनी टीका केली आहे.
Thane Politics
Thane Politicssarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane Politics : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला ‘आपला दवाखाना’ प्रकल्प अचानक बंद झाल्यानंतर त्याच्या जागी ‘आरोग्य मंदिरं’ सुरु झाल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रियलिटी चेक करत तीन आरोग्य मंदिरे बंद असल्याचे उघड केले आहे. या मुद्द्यावरून आता ठाण्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. केळकर यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केळकर यांनी आपल्या मतदारसंघात निधी आणून विकास कामे करुन दाखवावीत, असा टोला लगावला आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य मंदिरावरून भाजप विरुध्द शिंदेंची शिवसेना असा सामना अधिक्र तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बंद झाल्याचा मुद्दा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी लावून धरला. पालिकेने देखील संबधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. परंतु दुसरीकडे आपला दवाखान्याच्या जागी आरोग्य मंदिर सुरु करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकूडन करण्यात आला होता. त्यानुसार केळकर यांनी शहरातील ३ विविध आरोग्य मंदिरांना भेट दिली असता, ती आरोग्य मंदिरे बंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Thane Politics
Bachchu Kadu Protest : मोठी बातमी! बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांची उद्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी बैठक; कर्जमुक्तीची घोषणा होणार?

या संदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून कोपरीतील सावकर नगर भागातील आरोग्य मंदिर बंद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. याठिकाणी पाहणी केली असता, तेथे फितही कापून ठेवल्याचे दिसून आले आहे. तसेच त्या आरोग्य मंदिराच्या बाजूला कचरा असल्याचेही आढळून आले आहे. या मुद्यावरुन केळकर आक्रमक झाले आहेत. पालिकेने लोकप्रतिनिधींना खोटी माहिती दिली. त्यांच्या आरोग्याची चेष्टा असून लवकरच या विरोधात जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

प्रसुतीगृहाचा एनआयसीयु बंद

येथील दोन मजली प्रसूती गृहातील दुसऱ्या मजल्यावरील एनआयसीयु विभागात लवकर जन्मलेल्या बालकांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी २० इन्क्यूबेटर ठेवण्यात आले आहेत, मात्र उद्घाटनानंतर सहा महिने उलटूनही हा विभाग सुरू करण्यात आलेला नाही.

निधी आणून दाखवा...

आमदार संजय केळकर यांनी पाहणी केल्यानंतर बुधवारी कोपरी विभागातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केळकर यांच्यावर टीका केली आहे. हे आरोग्य मंदिर अद्याप सुरु झालेले नाही. त्याठिकाणी स्थापत्याची आतील कामे बाकी आहेत. याचे केवळ आधी भूमिपुजन करण्यात आले होते मात्र त्याच्या लोकार्पणाला मात्र केळकर यांना आमंत्रण दिले जाईल, असा टोला त्यांनी लगावला आहे. आधी तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी निधी मिळवा आणि विकासकामे करुन दाखवा, विकास कामे करीत नसल्यानेच तुम्हाला अशी कामे सूचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Thane Politics
Bachchu Kadu On BJP government : फडणवीसांचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर; बच्चू कडू रस्त्यावर, पेटवला सोयाबीन अन् कर्जमाफीसाठी 'अल्टीमेटम'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com